शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्यच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
3
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
4
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
5
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
6
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
7
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
8
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
9
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
10
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
11
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
12
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
13
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
14
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
15
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
16
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
17
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
18
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
19
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
20
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत

सरकारचे पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष; माधव गाडगीळ यांच्या सूचनांकडेही काणाडोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 19:57 IST

गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या,

पणजी : गोवा सरकारने राज्यातील पर्यावरणाकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी ज्या काही महत्त्वाच्या सूचना केल्या, त्या कानावर घेण्याचीदेखील सरकारची इच्छा नाही, अशा शब्दांत आम आदमी पक्षाचे नेते सिद्धार्थ कारापूरकर यांनी सरकारवर टीका केली आहे. 

कारापूरकर म्हणतात की, ‘पैसा फेकणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठी सरकारने पर्यावरणाच्या बाबतीत अनेक तडजोडी केल्याने आज राज्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला, मात्र त्यामुळे उद्भवलेली पूरस्थिती याला सरकारचा पर्यावरणाकडे असलेला दृष्टिकोनच जबाबदार आहे. खरेतर पर्यावरण संतुलन राखणे हे सरकारचे काम आहे, मोठ्या प्रमाणात चाललेली डोंगरकापणी, सखल भाग, शेती मातीचा भराव टाकून बुजविण्याचे प्रकार, वृक्षांची बेसुमार कत्तल यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झालेले आहे.ते पुढे म्हणतात की, ‘पर्यावरणतज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी सरकारला काही वर्षांपूर्वी सरकारला महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, परंतु त्यांचे कोणीही कानावर घेतले नाही.  केरळमध्ये मागच्यावर्षी जी आपत्ती आली त्याचेही भाकित त्यांनी आधीच केले होते.’

‘साळावलीबाबत खरी माहिती द्या’

सरकारने साळावली धरणातील पाण्याच्या ख-या पातळीबाबत लोकांना सांगावे, असे आवाहन करताना कारापूरकर म्हणतात की, ‘धरण भरले व जादा पाणी सोडावे लागले, यामुळे प्रसारमाध्यमांना जुलैमध्येच चांगले चित्र मिळाले. इतिहासात डोकावताना धरणाच्या मागील नोंदींवरून असे दिसते की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साळावली धरण भरते व जादा पाणी सोडावे लागते. कारण खाणीतील माती वाहून आल्याने पाण्याची साठवणूक करण्यास अडथळा येतो. राज्यातील अनेक नद्यांची हीच परिस्थिती आहे. साळावली धरण ही दक्षिण गोव्याची जीवनरेखा आहे व या धरणाच्या बाबतीतही केवळ काही जणांच्या हितसंबंधांसाठी तडजोड केली जात आहे. सरकारे बदलत राहतात; परंतु भविष्यात गोमंतकीयांनाच त्याची गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे कारापूरकर यांनी शेवटी म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवा