‘सरकारने खाणी ताब्यात घ्याव्यात’

By Admin | Updated: October 6, 2014 02:03 IST2014-10-05T01:13:54+5:302014-10-06T02:03:09+5:30

पणजी : राज्यातील खाणींचे लिज पुन्हा अगोदरच्याच खनिज व्यावसायिकांना देणे ही फसवणूक आहे. सरकारने खनिज खाणी ताब्यात घेऊन शासकीय

'Government should take possession of mine' | ‘सरकारने खाणी ताब्यात घ्याव्यात’

‘सरकारने खाणी ताब्यात घ्याव्यात’

पणजी : राज्यातील खाणींचे लिज पुन्हा अगोदरच्याच खनिज व्यावसायिकांना देणे ही फसवणूक आहे. सरकारने खनिज खाणी ताब्यात घेऊन शासकीय महामंडळामार्फत त्या चालवाव्यात, अशी मागणी कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाच्या गोवा शाखेने
केली आहे.
सचिव थालमान परेरा व जतीन नाईक यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषद घेतली. कम्युनिस्ट पक्षाने या वेळी लोकांना अपेक्षित असलेल्या खाण धोरणाचा मसुदा जाहीर केला. सरकारने नुकतेच जाहीर केलेले लिज मंजुरी धोरण हे दांभिक स्वरूपाचे आहे. शास्त्रीय पद्धतीने खाणी चालाव्यात म्हणून त्या खाणी सरकारने ताब्यात घ्याव्यात. तसेच गोवा खनिज विकास महामंडळ स्थापन करावे, असे परेरा म्हणाले. खाण अवलंबितांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक पॅकेजचा भार खाणमालकांना उचलण्यास सरकारने भाग पाडावे.

Web Title: 'Government should take possession of mine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.