सरकारने खाण व्यवसाय चालवावा
By Admin | Updated: December 22, 2015 01:30 IST2015-12-22T01:30:37+5:302015-12-22T01:30:53+5:30
जन्माला घातलेल्या मगोच्या अजस्र सिंहाला कमकुवत केलेले आहे. सिंह भाजपमयच केलेला आहे.

सरकारने खाण व्यवसाय चालवावा
(पान १ वरून) जन्माला घातलेल्या मगोच्या अजस्र सिंहाला कमकुवत केलेले आहे. सिंह भाजपमयच केलेला आहे. भाऊसाहेबांचा पक्ष चालवणाऱ्या मंत्री ढवळीकरांनी सामान्य जनतेचा कळवळा असल्यास आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. फक्त लाल दिव्यांच्या गाडीसाठी काँग्रेस किंवा भाजपच्याच गोटात राहून राजकारण करू नये. अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने आंदोलन पुकारल्यापासून भाजपने हे आंदोलन फक्त फिरवत ठेवण्याचे काम केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते त्याचबरोबर अपक्ष आमदारांनी आंदोलनास पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले.
ते म्हणाले, सेसा कंपनीचे एक अधिकारी अनिरुध्द जोशी हे खाणकाम बंद करण्याची धमकी देत आहेत. मात्र, जोशी यांनी गोव्यातील जमीन त्यांच्या वाडवडिलांची नसल्याचे भान ठेवावे. खाण व्यवसाय सेसा कंपनीने सुरू केलेला नाही याची जाणीवही त्यांनी ठेवण्याची गरज आहे. गोव्यातील खाण व्यवसाय चालवण्यास गोमंतकीय समर्थ असून बहुतांश ट्रकमालकही सेसा कंपनीचे भागधारक आहेत. त्यामुळे सेसा बंद करण्याचा निर्णय एकटे अनिरुध्द जोशी घेऊ शकत नाहीत.
सेसा कंपनी सरकारवर दबाव आणण्यासाठी खाणकाम बंद पाडण्याची धमकी देत आहे. मात्र, ही धमकी त्यांना महागात पडेल, असा इशाराही गावस यांनी या वेळी दिला. तसेच जोपर्यंत खनिज वाहतुकीसाठी रास्त दर मिळत नाही, तोपर्यंत अखिल गोवा ट्रकमालक संघटना आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)