‘आप’ कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध

By Admin | Updated: June 10, 2015 01:03 IST2015-06-10T01:03:35+5:302015-06-10T01:03:42+5:30

म्हापसा : ‘आप’च्या कार्यकर्त्यांना साळगाव पोलिसांनी काढलेल्या नोटिसीविरोधात आप कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर जाऊन

Government protests from AAP workers | ‘आप’ कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध

‘आप’ कार्यकर्त्यांकडून सरकारचा निषेध

म्हापसा : ‘आप’च्या कार्यकर्त्यांना साळगाव पोलिसांनी काढलेल्या नोटिसीविरोधात आप कार्यकर्त्यांनी मंगळवारी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर जाऊन पोलीस व सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, नोटीस बजावलेल्या आपच्या कार्यकर्त्यांच्या जबान्या पोलिसांनी मंगळवारी नोंदवून घेतल्या.
कळंगुट येथे महिला पर्यटकांवर झालेल्या बलत्कारानंतर मंत्री दिलीप परुळेकर यांचा निषेध करण्यासाठी रविवारी जमलेल्या आपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बेकायदा जमाव व खासगी मालमत्तेत अतिक्रमण केल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद केला होता. मंत्र्यांचे अंगरक्षक विरेंद्र नाईक यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आप कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती व जबानी देण्यासाठी मंगळवारी स्थानकावर बोलावण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून पोलीस स्थानकावर येऊन पोलीस व सरकारचा निषेध नोंदवला.
दरम्यान, गुन्हा नोंद
झालेल्या दोन्ही कार्यकर्त्यांच्या जबान्या पोलिसांनी नोंद करून
घेतल्या आहेत. निरीक्षक राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारनुसार आप कार्यकर्त्यांच्या जबान्या नोंद करून घेतल्या आहेत. गरज पडली तर आणखी काहीजणावर गुन्हा नोंद होऊ शकतो, असे ते म्हणाले.
आपच्या कार्यकर्त्यांनी शांततेने आंदोलन केले असतानाही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याच्या प्रकाराचा आपचे समन्वयक दिनेश वाघेला यांनी निषेध केला. लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनावर काळीमा फासण्याचे हे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Government protests from AAP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.