सरकार तटस्थ, कामगार अस्वस्थ
By Admin | Updated: December 22, 2015 01:26 IST2015-12-22T01:26:41+5:302015-12-22T01:26:59+5:30
पणजी : सुमारे साडेतीन वर्षांनंतर राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असताना ट्रकमालकांनी आंदोलन

सरकार तटस्थ, कामगार अस्वस्थ
पणजी : सुमारे साडेतीन वर्षांनंतर राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असताना ट्रकमालकांनी आंदोलन पुकारल्यामुळे हा व्यवसाय पुन्हा संकटात सापडलेला आहे. खनिज वाहतूक दराच्या मागणीबाबत ट्रकमालक संघटना आणि सेसा-वेदांता खाण कंपनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचेच सोमवारचे चित्र होते. ट्रकमालक संघटनेने तर अत्यंत जहाल भाषा वापरत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार सोमवारी पुन्हा व्यक्त केला. दुसरीकडे, राज्य सरकार या प्रश्नाबाबत तटस्थ राहिले आहे. या सर्व घडामोडींमुळे तिढा जैसे थे असाच राहिलेला आहे. परिणाम असा झाला आहे की, कामगारवर्गाची अस्वस्थता कमालीची वाढलेली आहे.
खनिज वाहतूक बंदच : ट्रकमालकांसाठी खनिज वाहतुकीच्या दराबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्र्सेकर यांची सेसा गोवा कंपनीशी बोलणी (पान २ वर)