सरकारच्या कर्जाचे व्याज फक्त ९0 कोटी दरमहा!
By Admin | Updated: July 15, 2015 01:44 IST2015-07-15T01:42:53+5:302015-07-15T01:44:36+5:30
पणजी : सरकारला आर्थिक गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या कसरती कराव्या लागत आहेत. सरकारच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला

सरकारच्या कर्जाचे व्याज फक्त ९0 कोटी दरमहा!
पणजी : सरकारला आर्थिक गरजा भागविण्यासाठी वेगवेगळ्या कसरती कराव्या लागत आहेत. सरकारच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला असून दुसरीकडे रोखे विक्रीस काढून खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलण्याचे प्रकार चालू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, सरकार एकूण कर्जाच्या व्याजाचेच दरमहा ९0 कोटी रुपये व्याज फेडत आहे.
पायाभूत सुविधा, विकासकामे तसेच अन्य गरजा भागविण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नसल्याने रोखे काढले जात आहेत. विरोधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी आरबीआयच्या अहवालाचा हवाला देऊन सरकारच्या डोक्यावरील कर्ज १३ हजार कोटींवर पोहोचल्याचा आणि सरकार कर्ज काढत सुटल्याचा आरोप केला होता. (पान २ वर)