शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधून वीज घेणे सरकारने थांबविले, दक्षिण गोव्याला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 19:57 IST

कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते.

पणजी : कर्नाटकमधून म्हणजेच दक्षिण ग्रीडच्या माध्यमातून गोव्याला एवढी वर्षे जी वीज यायची, ती वीज स्वीकारणे गोवा सरकारने सोमवारपासून थांबविले आहे. आता पश्चिम ग्रीडमधून म्हणजे महाराष्ट्राच्या दिशेहून दक्षिण गोव्याला वीज पुरवठा होईल. दक्षिण गोव्यातील लोकांना भेडसावणारी वीज समस्या यामुळे सुटेल, असा विश्वास वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्नाटकमधून जी वीज वाहिनी दक्षिण ग्रीडची वीज घेऊन गोव्यात येते, ती वाहिनी घनदाट जंगल क्षेत्रातून तसेच अनमोड, मोले अशा घाटांतून येते. दऱ्यांमधून वीज वाहिनी येते. पावसाळ्य़ात झाडे पडतात तसेच उंच बांबूही त्या वीज वाहिन्यांना येऊन टेकतात आणि वारंवार वीजेची समस्या निर्माण होते. ती समस्या आम्ही त्वरित दूर करू शकत नाही, कारण अनेकदा कर्नाटकमध्ये वीज वाहिनीला समस्या आलेली असते. कर्नाटकच्याच यंत्रणेने ती समस्या दूर करावी लागते. पण त्यासाठीही कर्नाटकच्या यंत्रणेला जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच ती यंत्रणा ते काम करू शकते. आम्ही त्यांना आदेश देऊ शकत नाही, असे मंत्री काब्राल म्हणाले. 

देशभर एकच राष्ट्रीय ग्रीड आहे. तिथूनच पूर्ण देशाला वीजेचा पुरवठा होतो. आम्ही सगळे सोपस्कार पार पाडले व कर्नाटमधून येणारी वीज थांबवली आहे. पश्चिम ग्रीडमधून उत्तर गोव्याला वीज येते. हीच वीज दक्षिण गोव्यालाही येईल. धारबांदोडय़ाला पुढील तीन-चार वर्षात 40 केव्ही क्षमतेचे नवे मोठे वीजउपकेंद्र उभे केले जाईल. तिथे एक लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन घेतलेली आहे. एकदा ते केंद्र उभे राहिल्यानंतर मग कर्नाटकमधील वीज पुरवठा आम्ही पुन्हा स्वीकारू, असेही काब्राल यांनी जाहीर केले.

लोकांनी त्याग करावा गोव्याला 1 हजार मेगावॅट वीज मिळते. आम्ही फक्त 650 मेगावॅट एवढीच वीज वापरू शकतो. कारण वीज वितरणाचे जाळे आमच्याकडे नाही. ते जाळे उभे करण्यासाठी आवश्यक सुधारणा आम्ही करणार आहोत. आमच्याकडे वीज कमी नाही. चोवीस तास पूर्ण गोव्याला वीज देता येते. मात्र सुधारणा व्हायच्या असेल व लोकांना अखंडीतपणे वीज हवी असेल तर लोकांना थोडा त्याग करावा लागेल, असा सल्ला काब्राल यांनी दिला. हा त्याग कोणता तेही त्यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी लोकांनी थोडी तरी जमीन उपलब्ध करून द्यायला हवी. वीज वाहिन्या एखाद्या ठिकाणहून जात असतील तर तिथे विरोध करू नये. पर्रा भागात अलिकडेच खूप विरोध झाला, असे काब्राल म्हणाले. महाराष्ट्र व कर्नाटकच्या तुलनेत गोव्यात वीजेचे दर कमी आहेत. आमच्याकडे पुष्कळ ट्रान्सफॉर्मर्स उपलब्ध आहेत. एखाद्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मोडला तर, आम्ही नवेच ट्रान्सफॉर्मर्स बसवतो. लोकांना व दक्षिणेच्या एका सरपंचालाही तांत्रिक गोष्टी कळतच नाहीत. वीज नाही म्हणजे नेमके काय झाले हे न कळताच लोक बोलतात असेही काब्राल म्हणाले.

टॅग्स :electricityवीज