सरकारने वाटला बोनस
By Admin | Updated: November 3, 2015 02:11 IST2015-11-03T02:11:21+5:302015-11-03T02:11:58+5:30
पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची खुशखबर असून वित्त खात्याने सोमवारी त्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. सुमारे ३५ ते ४0 हजार सरकारी व

सरकारने वाटला बोनस
पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या बोनसची खुशखबर असून वित्त खात्याने सोमवारी त्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. सुमारे ३५ ते ४0 हजार सरकारी व अनुदानित कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांना ३५00 रुपये बोनसचा लाभ होणार आहे. ४६00 रुपये आणि त्यापेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या क वर्ग कर्मचारी, तसेच बिगर राजपत्रित ब वर्ग कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे.
वित्त खात्याच्या अवर सचिव सुषमा कामत यांनी यासंबंधीचे परिपत्रक
काढले असून सर्व खातेप्रमुख, कार्यालये तसेच सचिवालयातील कार्यालयांना
रवाना केले आहे.
खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी सुमारे साडेसोळा कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे. दीपावली येत्या १0 रोजी असून त्याआधी हा बोनस ई-पेमेंट पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
२0१२ पासून राज्य सरकारने बिगर राजपत्रित ब वर्ग कर्मचाऱ्यांना बोनस बंद केला आहे. बोनस पात्रतेसाठी ग्रेड पे मर्यादाही घातली आहे. त्यामुळे आता ४६00 रुपये आणि त्यापेक्षा अधिक ग्रेड पे असलेल्या प्राथमिक शिक्षक, लिपिक, शिपाई यांसारख्या कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांनाच तो लागू होतो. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ५५ हजारांच्या
घरात आहे. याशिवाय सरकारी
अनुदानावर चालणाऱ्या शैक्षणिक
संस्था, गोवा विद्यापीठासारख्या स्वायत्त संस्था आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ मिळेल.
(प्रतिनिधी)