सरकार धारेवर

By Admin | Updated: July 15, 2017 02:09 IST2017-07-15T02:01:10+5:302017-07-15T02:09:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : भाजप सरकारच्या विरोधातील विविध आंदोलनांनी शुक्रवार गाजला. वीजबिलांच्या वाढीव रकमेचा जबरदस्त फटका बसल्याने

Government Dharevar | सरकार धारेवर

सरकार धारेवर

लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : भाजप सरकारच्या विरोधातील विविध आंदोलनांनी शुक्रवार गाजला. वीजबिलांच्या वाढीव रकमेचा जबरदस्त फटका बसल्याने वातावरण तापले असतानाच विरोधी काँग्रेस पक्षाने खात्याच्या मुख्य अभियंत्यांना घेराव घालून फैलावर घेतले. सतरा वर्षे बांधकाम खात्यात कंत्राटी सेवा बजावणाऱ्या कामगारांनी कायम करण्याच्या मागणीसाठी आल्तिनो येथे मुख्यालयावर धडक मारली. टुरिस्ट टॅक्सीवाल्यांनी स्पीड गव्हर्नरच्या प्रश्नावर वाहतूक खात्यावर चाल केली. भाजप उपाध्यक्ष अनिल होबळे यांच्याविरुद्ध हुंडाप्रकरणी चौकशीला वेग द्यावा आणि त्यांना अटक करावी, यासाठी महिला काँग्रेसने महिला पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. कदंब बसस्थानकासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मागण्यांसाठी निदर्शने केली. अशा तऱ्हेने आंदोलनांनी सरकारला धारेवर धरले.

Web Title: Government Dharevar