गोमेकॉत आता वृध्दांसाठी विशेष ओपीडी
By Admin | Updated: July 16, 2015 02:01 IST2015-07-16T02:01:42+5:302015-07-16T02:01:53+5:30
गोमेकॉत वयोवृद्ध रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे ज्येष्ठांची डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी होत असलेली परवड दूर होईल

गोमेकॉत आता वृध्दांसाठी विशेष ओपीडी
किशोर कुबल ल्ल पणजी
गोमेकॉत वयोवृद्ध रुग्णांसाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात येणार आहे़ त्यामुळे ज्येष्ठांची डॉक्टरांकडून तपासून घेण्यासाठी होत असलेली परवड दूर होईल. वृद्ध रुग्णांना एकाच छताखाली उपचाराच्या सर्व सुविधा मिळणार आहेत. महिनाभरात ही विशेष ओपीडी सुरू होईल. सरकारकडून त्यासाठी आवश्यक ते परवानेही मिळाले आहेत, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्ट्रोक, मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब, हृदयरोग, स्मृतिभ्रंश आदी रोगांचे प्रमाण वाढलेले आहे. गोमेकॉच्या वेगवेगळ्या ओपीडींमध्ये वयोवृद्ध पुरुष तसेच महिला रुग्णांची लक्षणीय उपस्थिती असते. या ज्येष्ठ नागरिकांना अन्य रुग्णांबरोबर ताटकळत रहावे लागते़ त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र ओपीडी असावी, असा प्रस्ताव गोमेकॉ प्रशासनाने ठेवला होता. सरकारने त्यास मंजुरी दिली असून महिनाभरात ही विशेष ओपीडी सुरू होईल.