गोमेकॉ... जिथे हरवतात रक्ताच्या चाचणीचे अहवाल!
By Admin | Updated: December 11, 2015 00:25 IST2015-12-11T00:23:51+5:302015-12-11T00:25:33+5:30
पणजी : गोमेकॉत प्रसंगानुरूप विविध अतिरिक्त सुविधांची जोड देण्याचा एका बाजूने प्रयत्न होत असतानाच रक्ताच्या चाचणीचे

गोमेकॉ... जिथे हरवतात रक्ताच्या चाचणीचे अहवाल!
पणजी : गोमेकॉत प्रसंगानुरूप विविध अतिरिक्त सुविधांची जोड देण्याचा एका बाजूने प्रयत्न होत असतानाच रक्ताच्या चाचणीचे अहवाल हरवण्याचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे रुग्णांची नाहक धांदल होत आहे. रुग्णांची ती मोठी डोकेदुखी ठरत आहे.
रक्ताचे व लघवी चाचणीचे अहवाल गोमेकॉच्या १३ क्रमांकवर असलेल्या प्रयोगशाळेत केले जातात. रुग्णांसाठी ते मोफत असतात. चाचणीचे अहवाल संबंधित ओपीडीच्या नोंदणी काउंटरवर मिळविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अनेकवेळा असे होते की ओपीडीच्या काउंटरवर हे अहवालच मिळत नाहीत. प्रयोगशाळेतून अहवाल आले नाहीत, असे रुग्णांना सांगितले जाते. त्यामुळे रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक प्रयोगशाळेकडे धाव घेतात. तिथे त्यांना अहवाल ओपीडी काउंटरवर पाठविल्याचे सांगितले जाते. रुग्णांना इकडून तिकडे नाचविण्याचे हे प्रकार वारंवार घडतात. गुरुवारी मेडिसीन विभागात दोन रुग्णांच्या बाबतीत अशीच गोष्ट घडली. शेवटी डॉक्टरने हस्तक्षेप करून त्यांना दुहेरी अहवाल मिळवून दिला.
दुहेरी प्रत मिळविण्यासाठी डॉक्टर पत्र लिहून देतात हे खरे आहे; परंतु त्यासाठी पुन्हा रुग्णाला प्रयोगशाळेत धाव घ्यावी लागते. एरवीच लांबलचक रांगेत उभे राहून आलेल्या रुग्णांना आणखी थांबावे लागते. त्यामुळे लोकांची गैरसोय टाळण्यासाठी दोन पर्याय गोमेकॉ प्रशासनाकडे आहेत. एक म्हणजे मुळात
चाचणी अहवाल गहाळ होऊच देऊ नये
आणि दुसरे म्हणजे ते गहाळ झाले, तर दुहेरी
प्रत मिळविण्यासाठी डॉक्टरच्या चिठ्ठीची
सक्ती असता कामा नये; परंतु, यापैकी कोणत्याच पर्यायाची अंमलबजावणी अद्याप केलेली दिसत नाही. (प्रतिनिधी)