गोमेकॉ ‘अत्यवस्थ’
By Admin | Updated: August 9, 2014 01:24 IST2014-08-09T01:19:35+5:302014-08-09T01:24:52+5:30
पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) वीज व पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तेथील सेवा कोलमडली आहे. गोमेकॉतील वीजपुरवठा

गोमेकॉ ‘अत्यवस्थ’
पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) वीज व पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तेथील सेवा कोलमडली आहे. गोमेकॉतील वीजपुरवठा गुरुवारी अचानक खंडित झाला व अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या. वीज नसल्याने पाणी नाही, अशीही स्थिती रुग्णांच्या व रुग्णांच्या नातेवाईकांच्या वाट्याला आल्याने संताप व्यक्त होत आहे. सोमवारी विधानसभेत याबाबतचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
गुरुवारी रात्री गोमेकॉतील ३२ केव्ही पॅनलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे धावपळ उडाली. अंधारामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत असल्याने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना त्रास सोसावा लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी स्थितीत थोडी सुधारणा झाली. जनरेटरचाही वापर करण्यात आला. त्यामुळे वॉर्डांमध्ये वीजपुरवठा होता; पण शुक्रवारीही गोमेकॉतील पूर्ण वीज यंत्रणा सुधारली नव्हती. आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी गोमेकॉला भेट दिली व स्थितीची पाहणी केली. मंत्री पार्सेकर यांनी तेथील वीज यंत्रणा व पाणीपुरवठ्याचीही पाहणी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)