शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

राजकीय दबावाखाली गोल्फ कोर्सला मान्यता!

By admin | Updated: June 8, 2014 01:24 IST

पणजी : तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या लाखभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत गोल्फ कोर्स प्रकल्प उभा करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने

पणजी : तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या लाखभर चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत गोल्फ कोर्स प्रकल्प उभा करण्यासाठी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने राजकीय दबावाखाली दिल्ली येथील कंपनीला मान्यता दिली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केला. फर्नांडिस म्हणाले की, काँग्रेस सरकारच्याही काळात आम्ही एकाही गोल्फ कोर्सला गोव्यात मान्यता दिली नाही; कारण गोल्फ कोर्ससाठी प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज असते. भू-जल पातळी त्यामुळे खालावते. आता तेरेखोल येथे शेतकऱ्यांच्या जमिनीत गोल्फ कोर्स उभा केला जाणार आहे. त्या प्रकल्पाला पाणी कुठून आणले जाणार ते सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली. गोल्फ कोर्सला आमचा विरोध नाही; पण पाण्यासारख्या सुविधा गोल्फ कोर्सला पुरविताना सरकारने गरीब शेतकऱ्यांच्या हिताआड येऊ नये, असे फर्नांडिस म्हणाले. राज्यातील किनाऱ्यांवर सध्या तेलगोळे वाहून आले आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यातील किनारपट्टी तेलगोळ्यांपासून स्वच्छ करण्याची जबाबदारी तटरक्षक दलाची आहे; पण तटरक्षक दल आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका फर्नांडिस यांनी केली. मी येत्या आठवड्यात तटरक्षक दलाविरुद्ध संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याकडे तक्रार करणार आहे; कारण तेलगोळ्यांमुळे गोव्यातील सागरी पाणी प्रदूषित झाले आहे. मत्स्यसंपत्ती धोक्यात आली असून लोकांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. तेलगोळ्यांपासून किनारपट्टीचे रक्षण करणे हे तटरक्षक दलाचे काम आहे. किनारपट्टीत सोन्याची तस्करी रोखणे हेही तटरक्षक दलाचेच काम आहे. राज्य सरकारने तेलगोळ्यांच्या समस्येबाबत काहीच भाष्य केलेले नाही. तटरक्षक दलाने एव्हाना किनारे स्वच्छ करायला हवे होते. तटरक्षक दलाकडे त्यासाठीची सगळी यंत्रणा आहे. मात्र, तिचा वापर केला जात नाही, असे फर्नांडिस म्हणाले. तेलगोळ्यांचे दुष्परिणाम मत्स्यसंपत्तीवर होत असून गोमंतकीयांना आरोग्यावर यापुढे जास्त खर्च करावा लागेल, असे फर्नांडिस यांनी नमूद केले. (खास प्रतिनिधी)