दाबोळी विमानतळावर २.१५ कोटींचे सोने जप्त
By Admin | Updated: June 12, 2015 00:46 IST2015-06-12T00:45:58+5:302015-06-12T00:46:25+5:30
वास्को : गोवा कस्टम खात्याने दाबोळी विमानतळावर गुरुवारी दुबईहून कतार एअरलाईन्स विमानाने आलेल्या भटकळ-कर्नाटक येथील एका प्रवाशाकडून ७़७०५

दाबोळी विमानतळावर २.१५ कोटींचे सोने जप्त
वास्को : गोवा कस्टम खात्याने दाबोळी विमानतळावर गुरुवारी दुबईहून कतार एअरलाईन्स विमानाने आलेल्या भटकळ-कर्नाटक येथील एका प्रवाशाकडून ७़७०५ किलो सोने जप्त केले़ या सोन्याची किंमत २़१५ कोटी रुपये आहे़
तस्करीच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव साजिद सय्यद अहमद एक्किथेर असे आहे़ कस्टम अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसर, आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोवा कस्टमने मोहीम राबविली आहे़ गुरुवारी सकाळी दाबोळी विमानतळावर कतार एअरलाईन्सच्या उड्डाण क्रमांक क्यूआऱ ५२२ या विमानाने एक प्रवासी उतरला़ त्याच्या हालचालींवरून कस्टम अधिकाऱ्याना संशय आल्यामुळे त्यांनी या प्रवाशाची कसून झडती घेतली असता, त्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत प्रत्येकी १० तोळ्याची ४९ आणि प्रत्येकी १ किलो वजनाची दोन सोन्याची बिस्किटे सापडली़ या सर्व सोन्याचे एकूण वजन ७़७०५ किलो झाले़
कस्टम अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाचा जबाब घेतला असता, त्याने डेरा-दुबई येथील सलीम भाई या व्यक्तीने त्याला हे सोने तस्करीद्वारे गोव्याबाहेर नेण्यासाठी दिले होते, असे सांगितले़ ही संपूर्ण कारवाई दाबोळी विमानतळाच्या हवाई गुप्तहेर विभागाच्या (पान ८ वर)