शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
4
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
5
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
6
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
7
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
8
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
9
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
10
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
11
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
12
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
13
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
14
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
15
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
16
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
17
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
18
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
19
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर

गोव्याचा फेस्टिव्ह मोसम सुरू, अतिमहनीय व्यक्तींच्या भेटी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 7:52 PM

डिसेंबर महिन्यासोबत गोव्याचा फेस्टिव्ह मोसम सुरू झाला आहे. सेंट झेवियर्स फेस्त, नाताळ मग नववर्ष साजरे करणो अशा विविध कारणास्तव लाखो पर्यटक ह्या महिन्यात गोव्याला भेट देतील.

पणजी : डिसेंबर महिन्यासोबत गोव्याचा फेस्टिव्ह मोसम सुरू झाला आहे. सेंट झेवियर्स फेस्त, नाताळ मग नववर्ष साजरे करणो अशा विविध कारणास्तव लाखो पर्यटक ह्या महिन्यात गोव्याला भेट देतील. नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक अतिमहनीय व्यक्ती गोव्यात येणार आहेत. उत्तर व दक्षिण गोव्यातील किना-यांवर सध्याही लाखो पर्यटकांची गर्दी आहे.

विशेषत: देशी पर्यटकांची गोव्यात झुंबड उडाली आहे. जुनेगोवे येथील सेंट झेवियर्स फेस्तानिमित्तानेही बरेच भाविक पर्यटक गोव्यात आलेले आहेत. किनारी भागात वाहनांची संख्याही खूप वाढलेली आहे. येत्या पंचवीस दिवसांत स्टेट गेस्ट म्हणून अनेक पाहुणे गोव्यात येणार आहेत. यात काही केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मंत्री, न्यायाधीश यांचा समावेश आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानींसह बॉलिवूडचे अनेक कलाकार दरवर्षी गोव्यात नववर्ष साजरे करण्यासाठी येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेही येतात. यावेळीही अनेक दिग्गज दि. 30, 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी गोव्यात असतील. 31 डिसेंबरला गोव्याच्या किनारपट्टीत नववर्ष स्वागतासाठी जंगी पाटर्य़ाचे आयोजन हॉटेल्सकडून केले जाणार आहे. त्याबाबतची तयारी सुरू आहे. 

सुरेश प्रभू, जावडेकर गोव्यातगोवा विद्यापीठाचा पदवीदान सोहळा येत्या 15 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे येत्या 15 रोजी गोव्यात दाखल होतील. तत्पूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू हे गोव्यात येऊन जातील. प्रभू हे उद्या 5 रोजी किंवा 6 रोजी गोव्यात येतील. 7 रोजी पणजीत अन्न प्रक्रियेमध्ये एमएसएमईएस इकोसिस्टमला बळकी या विषयावर परिषद होत आहे. त्या परिषदेला प्रभू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. अनुसूचित जाती-जमाती व महिला उद्योजकांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांविषयी जागृती करणे हा परिषदेचा प्रमुख हेतू आहे. याच महिन्यात गोव्यात आयटीविषयक आणि अन्य परिषदाही होणार आहेत.

टॅग्स :goaगोवा