‘शैक्षणिक हब’ बनण्याची गोव्याची क्षमता!
By Admin | Updated: July 10, 2015 01:42 IST2015-07-10T01:42:32+5:302015-07-10T01:42:40+5:30
पणजी : महाविद्यालयीन शिक्षणासाठी पदवीपूर्व स्तरावर सहा नव्या संस्थांची शिफारस निवृत्त प्राचार्य माधव कामत यांच्या अध्यक्षतेखालील

‘शैक्षणिक हब’ बनण्याची गोव्याची क्षमता!
पणजी : महाविद्यालयीन शिक्षणासाठी पदवीपूर्व स्तरावर सहा नव्या संस्थांची शिफारस निवृत्त प्राचार्य माधव कामत यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली आहे. गोवा शैक्षणिक हब बनविण्यास वाव असून तीन अद्ययावत, सुनियोजित शैक्षणिक वसाहतींचीही शिफारस करण्यात आली आहे. दुसरीकडे विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये भौतिकशास्त्र (फिजिक्स) व गणित शिक्षकांचा तुटवडा असून भविष्यात ही समस्या आणखी बिकट बनू शकते, असा धोक्याचा इशाराही समितीने दिला आहे. वाणिज्य आणि उद्योग क्षेत्रातील मनुष्यबळाचा विचार करता राज्यात मडगाव, केपे, वास्को, पणजी, म्हापसा व फोंडा अशी किमान सहा रात्र महाविद्यालये उघडावीत, असे अहवालात सुचविण्यात आले आहे.
राज्यात नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठी येणारे अर्ज कोणत्या निकषांवर विचारात घेतले जावेत, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा एमईएस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य
एम. एस. कामत यांच्या अध्यक्षतेखाली (पान ७ वर)