गोव्याचे धावपटू र्पुजूत झा, साक्षी काळे भारतीय संघात
By समीर नाईक | Updated: March 22, 2024 15:25 IST2024-03-22T15:23:23+5:302024-03-22T15:25:32+5:30
पणजी: बेंगळुरू येथे दि. २५ आणि २६ मार्च दरम्यान होणाऱ्या ६ व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ ...

गोव्याचे धावपटू र्पुजूत झा, साक्षी काळे भारतीय संघात
पणजी: बेंगळुरू येथे दि. २५ आणि २६ मार्च दरम्यान होणाऱ्या ६ व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गोव्याचे धावपटू र्पुजूत झा आणि साक्षी काळे यांची निवड झाली आहे. र्पुजूत झा आणि साक्षी काळे अंधत्व गटात सहभागी होणार आहे.
साक्षी काळे हीने गेल्यावर्षी झालेल्या पाचव्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व करत पदक प्राप्त केले होते. काळेने या व्यतिरीक्त २०२२, २०२३ मध्ये झालेल्या पॅरा ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक पदके मिळवली आहेत. तर र्पुजूत झा याने देखील अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करत पदके मिळवली आहेत.
६ व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये र्पुजूत झा आणि साक्षी काळे दोघेही १०० मीटर, आणि २०० मीटर धावणे तसेच लांब उडीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल गोवा पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष विश्राम नाईक, सचिव सुदेश ठाकूर व इतर सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देखील दिल्या.