शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाराज, माफियाराज संपविण्याची गरज: आरोग्य मंत्री विश्वजीत राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:46 IST

उसगाव व इतरत्र भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेवेळी आक्रमक विधाने

लोकमत न्यूज नेटवर्क, उसगाव/वाळपई : गोव्यात माफियाराज व गुंडाराज संपविण्याची गरज आहे. बाहेरून गोव्यात येणाऱ्या काही घटकांकडून आगळीक केली जाते. किनारपट्टी भागासह अन्यत्र माफियाराजविषयक तक्रारी येतात. हे माफियाराज संपविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल मंगळवारी केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना याविषयी मी पत्र लिहिन व आपली भूमिका सविस्तर मांडीन, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

उसगाव भागात मंत्री राणे यांच्या दोन दिवस अनेक कोपरा बैठका झाल्या. काही बैठकांवेळी मंत्री राणे यांनी कायदा सुव्यवस्थेच्या विषयाबाबत आक्रमक भूमिका मांडली. गुंडाराज व माफियाराज संपविण्यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे गोव्यात कारवाई करावी लागेल, असे मंत्री राणे म्हणाले. गोव्याची व गोमंतकियांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागेल, असे राणे म्हणाले.

'पार्ट्यांसाठी मदत करत नाही'

लोकसेवेसाठी मी राजकारणात आलो. मी कधीच दारुच्या पार्त्या करण्यासाठी कोणाला आर्थिक मदत करत नसतो. युवक व्यसनाधीन झालेले मला नको. कोणाला शैक्षणिक कामासाठी, गरिबांना घर बांधण्यासाठी किंवा वैद्यकीय खर्चासाठी मी मदतीचा हात देतो. अनेक वर्षे हे काम आम्ही करत आलो आहोत, लोकांची चूल पेटायला हवी, पुरेसे अन्नधान्य प्रत्येक गरिबाला मिळायला हवे, हे माझे धोरण आहे, असे राणे म्हणाले. सबका साथ, सबका विकास, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे. सर्व जाती-धर्माचे लोक आमचे असून, त्यांच्याशी संवाद व संपर्कवाढविण्याचे काम आम्ही करतो, असे राणे म्हणाले. नाइट क्लब रात्री बारा वाजता बंद व्हायलाच हवेत. नाइट लाइफवर नियंत्रण हवे, अन्यथा युवा पिढी व्यसनाधीन होईल, असे राणे म्हणाले.

'धर्मांत राजकारण आणू नका'

धर्माच्या गोष्टी राजकारणात आणू नका. मी सर्व धर्म मानतो. राजकारणात हिंदू ख्रिस्ती, मुस्लिम सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. धार्मिक सलोखा कायम राहिला पाहिजे. मी सर्व समाजातील व धर्मातील लोकांना सोबत घेऊन पुढील वाटचाल करणार आहे, असे राणे यांनी बाळी जुवे, म्हारवासडा येथे कोपरा बैठकीत सांगितले. यावेळी गांजे जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या भाजप उमेदवार समीक्षा नाईक, जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, सरपंच संजय उर्फ प्रकाश गावडे, उपसरपंच संगीता डोईफोडे, पंच सदस्य रामनाथ डांगी, गोविंद परब फात्रेकर, नरेंद्र गावकर, राजेंद्र नाईक, विनोद मस्कारेन्हस, विलियम मस्कारेन्हस, रेश्मा मटकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे उपस्थित होते.

प्राचीन मंदिरांचे नूतनीकरण करणार

मंत्री राणे म्हणाले, की देवस्थान समिती व महाजन यांची मान्यता मिळाल्यानंतर उसगावातील आदिनाथ, भूमिका व साईबाबा मंदिरांचे नूतनीकरण केले जाणार आहे. आदिनाथ मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. मी समाजात भेदभाव न करता युवा पिढीला सरकारी नोकऱ्या मिळवून देणार आहे.

उसगावच्या काँग्रेस उमेदवार फक्त माझ्याविरोधात रिल काढत असतात. त्याशिवाय त्यांना आणखी काही कामच नाही. काँग्रेसचे लोक सत्तरीच्या विरोधात आहेत. त्यांच्यात विकासकामे करण्याची धमक नाही, अशी टीका राणे यांनी केली.

विधानसभा मतदारसंघात असो अथवा जिल्हा पंचायत निवडणूक असो काँग्रेस पक्षाकडे उमेदवारच नाही. त्यामुळे ते मिळेल त्यांना उमेदवारी येतात. काँग्रेस पक्ष सत्तेवर येणारच नाही, असे मंत्री राणे म्हणाले. उमेदवार समीक्षा नाईक यांनी आपले विचार व्यक्त केले. आज १७ रोजी सायं. ५:०० वा. उडीवाडा उसगाव येथील अंबा भवानी मंदिरसमोर - राणे यांची सभा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Need to end Gundaraj, Mafia Raj: Minister Vishwajit Rane

Web Summary : Minister Vishwajit Rane calls for ending Gundaraj and Mafia Raj in Goa, promising to write to the Chief Minister. He emphasizes Goan safety, supports education and basic needs, and advocates for controlled nightlife. He also urges keeping religion out of politics and community harmony.
टॅग्स :goaगोवाLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषदBJPभाजपाPoliticsराजकारण