शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती सिलिंडरमधील होणारी गॅसची चोरी महिलांनी केली उघड; डिलिव्हरी बॉयचा काळा धंदा उजेडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:21 IST

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : तुमच्या घरात येणारा गॅस सिलिंडर १० ते १५ दिवसांतच संपतोय का? सिलिंडरचे वजन कमी भरतेय का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. शहरात गॅस सिलिंडरमधून गॅस चोरणारी एक मोठी टोळी सक्रिय असल्याचे एका खळबळजनक घटनेतून समोर आले आहे. गिरदोली येथील काही सतर्क महिलांनी गॅस डिलिव्हरी व्हॅनमध्ये चालणारा हा काळा धंदा रंगेहाथ पकडला असून, याचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरदोली येथे एका नामांकित कंपनीची गॅस डिलिव्हरी व्हॅन परिसरात आली असता, तेथील महिलांना संशय आला. व्हॅनमधील सिलिंडरवर एक काळे कापड झाकलेले होते. महिलांनी विचारणा केली असता, उन्हामुळे कापड टाकले आहे असे उत्तर डिलिव्हरी बॉयने दिले. मात्र, महिलांनी आग्रह धरून कापड हटवले असता, तिथे एका सिलिंडरमधून दुसऱ्या रिकाम्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

या तपासात असे दिसून आले की, प्रत्येक सिलिंडरमधून सुमारे २ ते ३ किलो गॅस चोरी केला जात होता. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना पूर्ण पैसे देऊनही वजनाने कमी गॅस मिळत आहे. या चोरीमुळेच ग्राहकांचा गॅस अवघ्या १०-१५ दिवसांत संपत असल्याचे तक्रारदार महिलांनी म्हटले आहे. रंगेहाथ पकडले गेल्यावर या कर्मचाऱ्यांनी आपले कृत्य झाकण्यासाठी महिलांना लाच देण्याचे आमिष दाखवले. 'पैसे घ्या आणि विषय संपवा, आम्ही तुम्हाला हवे तितके सिलिंडर मोफत देतो; पण पोलिसांत जाऊ नका,' अशी विनवणी त्यांनी केली. मात्र, संतप्त महिलांनी या प्रकरणाचा व्हिडिओ बनवून पुरावा गोळा केला.

तिघे ताब्यात

गॅसची ही चोरी केवळ आर्थिक फसवणूक नसून नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. रेल्वे ट्रॅक आणि निवासी भागाजवळ उभ्या असलेल्या या व्हॅनमध्ये गॅसची गळती होऊन एखादी ठिणगी पडली असती, तर मोठा स्फोट होण्याची शक्यता होती.

दोषींवर कारवाईची मागणी

संबंधित कर्मचारी नेहमीच ग्राहकांशी उद्धटपणे वागत असल्याचेही समोर आले आहे. सिलिंडरची मागणी केल्यावर बुकिंग रद्द झाल्याचे सांगून ग्राहकांना त्रास दिला जात होता. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित एजन्सी आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या टोळीत एक चालक आणि दोन मदतनीस असे तिघे सहभागी होते. जे पकडले गेल्यावर रेल्वे ट्रॅकच्या दिशेने पळून गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Women Expose Gas Theft from Cylinders; Delivery Boy's Illegal Business Unveiled

Web Summary : Alert women in Girdauli caught a gas delivery boy stealing gas from cylinders. The boy siphoned off 2-3 kg of gas per cylinder, offering bribes to silence the women. Citizens demand strict action.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी