शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला जीवे मारण्यासाठी पत्नीने दारुत टाकली पाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 15:29 IST

अंगावर शहारे आणणाऱ्या कुडचडे (गोवा) येथील बसुराज बारकी याच्या हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येऊ लागली आहे.

सुशांत कुंकळयेकर 

मडगाव - अंगावर शहारे आणणाऱ्या कुडचडे (गोवा) येथील बसुराज बारकी याच्या हत्या प्रकरणात आता नवीन माहिती पुढे येऊ लागली आहे. आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे त्याची पत्नी कल्पना हिने त्याच्या दारुत पाल टाकून त्याला विषबाधेने मारण्याचा प्रयत्न केला होता.

गोव्यामध्ये  ही हत्या 2 एप्रिल 2018 रोजी झाली होती. कल्पना हिने मित्र पंकज पवार, आदित्य गुज्जर, अब्दुल करीम शेख या तिघांच्या सहाय्याने आपल्या पतीची हत्या केली होती. तसेच त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे करुन ते जंगलात नेऊन  पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ही हत्या होऊनही तब्बल महिनाभर त्याला वाचा फुटली नव्हती. शेवटी ही होताना कल्पनाच्या खोलीवर असलेली तिची मैत्रीण सिमरन हिने कुडचडे पोलिसांना या हत्येची माहिती दिल्यानंतर वरील चौघांसह पोलिसांनी सुरेशकुमार सोळंकी यालाही अटक केली होती. बसुराजची हत्या करताना त्याचा गळा आवळण्यासाठी वापरलेली नायलॉन दोरी सुरेशकुमारने नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

बसुराज हा म्हापसा येथे एका माणसाकडे वाहन चालक म्हणून कामाला होता. तर त्याची पत्नी कुडचडे येथे एका फ्लॅटमध्ये राहत होती. महिन्यातून एकदा बसुराज आपल्या पत्नीला भेटायला कुडचडेला यायचा. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी कल्पना हिचे पंकज पवार व इतरांशी संबंध जुळले होते. याच संबंधावरुन पती-पत्नीत वारंवार खटके उडायचे. घरी आलेला असताना बसुराज दारु पिऊन आपल्या पत्नीशी वाद घालायचा. यामुळेच कल्पनाने आपल्या इतर साथीदारांच्या सहाय्याने पतीचा काटा काढण्याचे ठरविले होते.

हत्येच्या आधीच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी कल्पनाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी तिचा पती आपल्या मालकाकडून 50 हजार रुपये घेऊन घरी आला होता. त्या दिवशीही त्याने दारु पिऊन दंगा केला. आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी रात्रीच्यावेळी कल्पनाने त्याच्या दारुत पालीची शेपटी टाकून त्याला विषबाधेने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या या प्रयत्नाला यश आले नाही.कल्पनाने आपल्या या कृत्याची माहिती सुरेशकुमार याला दिली होती. 

दुसऱ्या दिवशी बसुराजने पुन्हा एकदा वाद उरकून काढल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास कल्पनाने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून आपल्या पतीचा खून केला. त्यानंतर इतर मित्रांना घरी बोलावून विळी, कटर आणि कोयत्याच्या सहाय्याने पतीच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. हे तुकडे केले जात असतानाच सुरेशकुमारचा तिला फोन आला असता, मृतदेहाचे तुकडे करणे चालू आहे असे सांगून कल्पनाने या कृत्याचे फोटो काढून व्हॉटस्अॅपवर सुरेशकुमारला पाठविले होते. त्यानंतर मध्यरात्री गोणपाटात या मृतदेहाचे तुकडे भरुन ते मोले येथील जंगलात फेकून दिले होते. या संबंधीचीही माहिती कल्पनाने सुरेशकुमारला दिली होती.

सध्या याच सुरेशकुमारने आपल्याला माफीचा साक्षीदार म्हणून सवलत द्यावी असा अर्ज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर केला असून या अर्जावर अभियोग पक्षाने आपली बाजू मांडावी असे न्या. सायोनोरा लाड यांनी नमूद करुन या प्रकरणावरील सुनावणी सोमवार 1 ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.

 

टॅग्स :MurderखूनgoaगोवाPoliceपोलिस