शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हादई पाणीप्रश्नी गोवाच जिंकेल : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 20:16 IST

अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

ठळक मुद्देगोवा फॉरवर्ड पक्षाने हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने दिलेला निवाडा सर्वानीच एकदा वाचून पहावा. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन फॉरवर्डने गोव्याचे नुकसान केले, त्यांचा मुद्दा लवादाने मान्य केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पणजी : म्हादई पाणीप्रश्नीगोवाच जिंकणार आहे. विजय हा गोव्याचाच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला. तसेच त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाला दोष दिला. राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन फॉरवर्डने गोव्याचे नुकसान केले, त्यांचा मुद्दा लवादाने मान्य केला नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हादई पाणीप्रश्नी माझा केंद्र सरकारवर पूर्ण विश्वास आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई पाणीप्रश्नी सर्वानीच थोडे थांबावे. किंचित कळ सोसावी. माझा केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावरही विश्वास आहे. गोवाच जिंकणार याची मला पूर्ण खात्री आहे. सध्या मी काही बोलत नाही पण गोव्याचा विजय झाल्यानंतर बोलेन. मग मात्र भलत्यांनीच कुणी यशाचे श्रेय घेऊ नये. जे काळे फलक हाती घेऊन रस्त्यावर येतात त्यांनी स्वत: साठी गोवा जिंकला असे समजू नये. अकारण श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

मुख्यमंत्री म्हणाले, की गोवा फॉरवर्ड पक्षाने हरित लवादाकडे धाव घेतल्यानंतर लवादाने दिलेला निवाडा सर्वानीच एकदा वाचून पहावा. फॉरवर्डने लवादाकडे जाऊन गोव्याची हानी केली. हानी कशी झाली ते आपण नंतर सांगेन. तूर्त निवाडा वाचल्यावरही कुणालाही मी काय सांगतोय ते कळेल.

राजकारण करू नका - विजय दरम्यान, फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हादईप्रश्नी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी गोवा फॉरवर्डची हरित लवादाकडे जाण्याची कृती ही राजकारण करण्याच्या चष्म्यातून पाहू नये. आम्ही लवादाकडे गेल्यानंतरच आम्हाला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयास पत्र पाठविण्यासाठी आधार मिळाला. लवादाने आमची याचिका फेटाळली नाही, असे सरदेसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधाने करावीत, कारण हा म्हादई नदीविषयीचा प्रश्न आहे. आम्ही सर्व गोमंतकीयांनी याबाबत एकत्र यायला हवे. जेव्हा आमची याचिका लवादासमोर आली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा वकील किंवा सरकारचा वकील लवादासमोर का उपस्थित राहिला नाही ते सावंत यांनी सांगावे. वकीलाने अनुपस्थित राहून गोव्याचे कोणते कल्याण केले ते सांगावे. आम्ही म्हादईप्रश्नी आमची लढाई सुरूच ठेवू. मुख्यमंत्र्यांना म्हादईचे काही पडलेले नाही, अशा प्रकारचा नेता मुख्यमंत्रीपदी यापुढेही राहणे हे गोव्यासाठी घातक आहे, असे सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीPramod Sawantप्रमोद सावंतChief Ministerमुख्यमंत्री