शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा शिपयार्ड भविष्यात ‘हॉवरक्राफ्ट’ केंद्र

By admin | Updated: November 15, 2014 02:05 IST

पर्रीकरांचा सत्कार : दाबोळीचे ‘आयएनएस हंसा’, मुरगाव बंदरातील गोवा विभागीय तटरक्षक दलास भेट

वास्को :गोवा शिपयार्ड ही संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाराखाली येत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील एक चांगली कंपनी आहे. या कंपनीतील तांत्रिक अधिकारी सक्षम असूनही या जहाज बांधणी कंपनीला नव्या नौदल बोटी बांधण्याच्या आर्डर्स का देण्यात येत नाहीत याची चौकशी करण्यात येईल़ तसेच हे भविष्यात हॉवरक्राफ्ट तयार करण्याचे भारतातील प्रमुख केंद्र बनण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. भारताचे ३६वे सरंक्षणमंत्री म्हणून पदभार सांभाळल्यानंतर प्रथमच गोवा भेटीवर आलेले मनोहर पर्रीकर यांचा शुक्रवारी सकाळी गोवा शिपयार्ड या संरक्षण मंत्रालयाच्या आखात्यारित असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी संरक्षणमंत्री पर्रीकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड़ नरेंद्र सावईकर, गोवा शिपयार्ड कंपनीचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक रिअर अ‍ॅडमिरल (निवृत्त) शेखर मित्तल, मंत्री मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित होते. संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले, गोवा शिपयार्ड या कंपनीकडे सर्व साधनसुविधा उत्कृष्ट आहेत़ मोठी जहाजे बांधण्याचे सामर्थ्य या कंपनीकडे आहे़ या कंपनीविरुध्द भ्रष्टाचाराच्या तक्रारी दक्षता खात्याकडे नाहीत, तरीही त्यांना नवीन बोटी बांधण्याच्या आॅर्डर्स मिळालेल्या नाहीत. तर इतर शिपयार्डना नौदलासाठी नव्या ४१ बोटी बांधण्याच्या आॅर्डर्स मिळाल्या आहेत़ गोवा शिपयार्ड या कंपनीचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक शेखर मित्तल म्हणाले, पर्रीकर हे संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेताना डोळ्यातून आनंदाश्रू आले; कारण पर्रीकर हे संरक्षणमंत्री बनल्याने आता गोवा शिपयार्डला ‘अच्छे दिन’ येणार असल्याची कल्पना डोळ््यासमोर उभी राहिली होती. गोवा शिपयार्ड कंपनीची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अनाथ अवस्था केली असून आमची व्यथा समजून घेणारी व्यक्ती आता उच्चपदी असल्याचे त्यांनी गर्वाने सांगितले. गोवा शिपयार्ड ही कामगारांची एक जीवन वाहिनी असून या कंपनीचा जितका दर्जा उंचविणार तितकीच कामगारांची स्थिती सुधारणार आहे़, असे ते म्हणाले. या वेळी गोवा शिपयार्ड कामगार संघटनेतर्फे किशोर शेट, अधिकारी संघटनेतर्फे विनायक नाईक यांनीही मार्गदर्शन केले. गोवा शिपयार्डचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक शेखर मित्तल यांनी संरक्षणमंत्री पर्रीकर यांना फेटा तसेच शाल देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी मंत्री पर्रीकर यांच्या हस्ते फिरत्या आरोग्य कल्याण प्रकल्पाअंतर्गत आरोग्य मित्र दंत वाहनाचे उद्घाटन झाले. या वेळी गोवा शिपयार्डतर्फे आयोजित कृषी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती देणारे प्रदर्शन भरविले होते. त्याला मंत्री पर्रीकर यांनी भेट दिली.