शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भाजपाच्या मंत्र्याकडून महिलेचे लैंगिक शोषण, गंभीर आरोप काँग्रेसचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 09:17 IST

Goa Politics News: गोव्यातील प्रमोद सावंत सरकारमधील एक मंत्री महिलेचे लैंगिक शोषण करीत असून मुख्यमंत्रीही त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे.

पणजी : सावंत सरकारमधील एक मंत्री महिलेचे लैंगिक शोषण करीत असून मुख्यमंत्री ही त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. १५ दिवसांत या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून न टाकल्यास नावासह मंत्र्याला उघडे पाडण्याचा तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा आरोप केला. मंत्र्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. ते म्हणाले की, या मंत्राने सदर महिलेला घर देतो, नोकरी देतो, अशी आश्वासने देऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आणि धमकी देऊन तिला गर्भपात ही करायला लावला. या मंत्र्याने सदर महिलेशी केलेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स, व्हॉट्सॲप चॅट, तसेच व्हिडिओ क्लिप्स मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवले असूनही त्यांनी कारवाई केली नाही. उलट हे पुरावे नष्ट केले. पोलिसांचा वापरही मुख्यमंत्र्यांनी केला. संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही एका बेकायदा व्यवसायात भागीदार आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असावेत.’

हवेत बाण मारू नका : भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे  काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘चोडणकर यांनी मंत्र्याचे नाव न घेता हवेत बाण मारला आहे.  राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडी अशी बेजबाबदार विधाने शोभत नाहीत. वैयक्तिक आरोप करताना त्यांनी मंत्र्याचे नाव घ्यावे. या प्रकरणात कथित पीडित महिलेने तक्रार केलेली नाही त्यामुळे आरोपाबाबत संशय घेण्यास वाव आहे.’

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळgoaगोवाBJPभाजपा