रशियनांसाठी गोवा सुरक्षितच!
By Admin | Updated: November 30, 2015 02:04 IST2015-11-30T02:04:35+5:302015-11-30T02:04:43+5:30
पणजी : रशियाने आपल्या नागरिकांना भारतात किंवा गोव्यात पर्यटनासाठी जाऊ नये; कारण ते असुरक्षित असल्याची

रशियनांसाठी गोवा सुरक्षितच!
पणजी : रशियाने आपल्या नागरिकांना भारतात किंवा गोव्यात पर्यटनासाठी जाऊ नये; कारण ते असुरक्षित असल्याची अॅडव्हायझरी काढल्याचे वृत्त पसरल्याने खळबळ उडाली. मात्र, सायंकाळी उशिरा येथील रशियन केंद्राच्या प्रमुखाने तसे काही नसल्याचे आणि भारताचे नाव सुरक्षित देशांच्या यादीतून वगळण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट केले. रशियन केंद्राच्या पणजी येथील प्रमुख एकातेरिना बेल्याकोवा यांनी भारताचे किंवा गोव्याचे नाव सुरक्षित देशांच्या यादीतून काढल्याचे आम्ही कोठेही निवेदन केलेले नाही, असे स्पष्ट केले.
इजिप्त व तुर्कस्तानला काळ्या यादीत टाकल्यानंतर रशियाने अॅडव्हायझरीची सुधारित यादी जाहीर केली आहे. त्यानुसार भारत आणि विशेषत: गोव्याला वगळले आहे, असे वृत्त सकाळपासून पसरले. गेल्या काही वर्षांमध्ये गोव्याला भेट देणाऱ्या रशियन पर्यटकांचे प्रमाण ५0 टक्क्यांनी घटले आहे. या नवीन अॅडव्हायझरीमुळे रशियन पर्यटक बंद झाल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, या शक्यतेमुळे पर्यटन खातेही धास्तावले. (प्रतिनिधी)