गोव्याची रुक्मिणी कामत भारतीय एमॅच्युअर कबड्डी फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी
By समीर नाईक | Updated: December 24, 2023 17:22 IST2023-12-24T17:22:46+5:302023-12-24T17:22:59+5:30
निवडणूक अधिकारी ओ. पी सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली.

गोव्याची रुक्मिणी कामत भारतीय एमॅच्युअर कबड्डी फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी
पणजी: रविवारी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या भारतीय एमॅच्युअर कबड्डी फेडरेशनच्या निवडणुकीत गोव्याच्या रुक्मिणी कामत यांची फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर विभोर विनीत जैन यांची अध्यक्षपदी व जितेंद्र सिंग ठाकूर यांची सचिवपदी निवड झाली आहे. रुक्मिणी कामत या गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्षा देखील आहेत.
निवडण्यात आलेली नवीन कमिटी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष विभोर विनीत जैन, सचिव जितेंद्र सिंग ठाकूर, उपाध्यक्ष कसम विरेश, कृष्णण लाल पनवर, रुक्मिणी कामत, एस. विजयाराणी, सुनिल तटकरे, खजिनदार रामाकांत सिंग, सहसचिव अमनप्रित सिंग माठी, दीपक जोशी, जयश्री स्वायन, तुषार अरोठे, विनय कुमार सिंग, सदस्य आलोक त्रिपाठी, बी. सी सुरेश, कल्याणसुंदरम् अलगू, प्रदीप यादव, प्रदीप हैदर, थोवनावजम मोतीलाल सिंग, विकास अवाना व यलामनचिली श्रीकांत.
निवडणूक अधिकारी ओ. पी सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. तसेच गटनेता तेजस्वी सिंग गेहलोत व इतर राज्यभरातील कबड्डी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.