गोव्यात 27 आमदारांची मालमत्ता 5 कोटींपेक्षा जास्त
By Admin | Updated: March 17, 2017 21:55 IST2017-03-17T21:55:50+5:302017-03-17T21:55:50+5:30
गोवा विधानसभेत पोहोचलेल्या 40 पैकी 18 आमदारांची शैक्षणिक पात्रता ही बारावी वा त्यापेक्षाही कमी आहे.

गोव्यात 27 आमदारांची मालमत्ता 5 कोटींपेक्षा जास्त
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 17 - गोवा विधानसभेत पोहोचलेल्या 40 पैकी 18 आमदारांची शैक्षणिक पात्रता ही बारावी वा त्यापेक्षाही कमी आहे तसेच सहा आमदारांच्या नावावर गंभीर गुन्हे आहेत. एकूण 27 आमदारांची मालमत्ता ही प्रत्येकी पाच कोटींपेक्षा जास्त आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस या संघटनेने सर्व उमेदवार, आमदार आणि मंत्री यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास केला आहे. वस्तुस्थिती मतदारांना कळून यावी, या हेतूने मंत्री, आमदारांच्या स्थितीचे आम्ही विश्लेषण केले आहे. मतदारांचे शिक्षण व्हावे एवढाच उद्देश त्यामागे आहे, असे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मसचे प्रमुख भास्कर असोल्डेकर यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
सत्ताकारण..अर्थकारण
कळंगुटचे मायकल लोबो सर्वात श्रीमंत, दाखविलेली मालमत्ता एकूण 54.59 कोटी. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांची मालमत्ता पन्नास कोटी. ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांची मालमत्ता 31 कोटी. तेरा आमदारांची मालमत्ता प्रत्येकी एक ते पाच कोटी.
तीन मंत्री दहावी-बारावी
सध्याच्या मंत्रिमंडळातील एकूण तीन मंत्री केवळ दहावी व बारावी शिक्षित आहेत. दोन मंत्री दहावी तर एकटा बारावी शिक्षित.