शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : शिमला कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला कळंगुट येथे अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 18:35 IST

शिमला येथील केंद्रीय कारागृहातून पसार झालेला तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी दर्शन कुमार (४६) याला कळंगुट येथे शनिवारी (18 नोव्हेंबर)अटक करण्यात आली.  

म्हापसा : शिमला येथील केंद्रीय कारागृहातून पसार झालेला तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी दर्शन कुमार (४६) याला कळंगुट येथे शनिवारी (18 नोव्हेंबर)अटक करण्यात आली. शिमला पोलिसांकडून कळंगुट पोलिसांना उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दर्शन कुमार हा कानडा-शिमला येथील कारागृहात 12 नोव्हेंबरला तेथील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला. २०१२ साली त्याने केलेल्या खून तसेच चोरी प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला कानडा येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. 

येथील कारागृहात त्याच्यावर बेकरीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेथूनच तो पसार झालेला. या प्रकरणात याच्या विरोधात शिमलातील सरदार पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आलेली. सदर आरोपी कळंगुट भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून शोध मोहीम हाती घेण्यात आली. ब-याच श्रमानंतर त्याला कळंगुट येथील मासळी मार्केटात पकडण्यात आले. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी गोव्यातून पळून जाण्याच्या मार्गावर होता. पळून गेला असता तर त्याला ताब्यात घेणे कठीण झाले असते. शिमलातील सरदार पोलीस स्थानकात आरोपीला पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा