शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डीजीपीनेच काढले गोवा पोलीसांच्या शिस्तीचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 21:04 IST

पोलीस खात्याच्या स्थापनेच्या दिवशीच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांच्या बेशिस्तपणाचे जाहीरपणे वाभाडे काढले.

पणजी: पोलीस खात्याच्या स्थापनेच्या दिवशीच पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलिसांच्या बेशिस्तपणाचे जाहीरपणे वाभाडे काढले. गचाळ संचालन, सदोष गणवेश आणि बेशीस्त वर्तनाबद्दल त्यांनी सर्वांना खडे बोल सुनावले आणि सुधारण्यासाठी तंबी दिली.  ताठ चालता का येत नाही? सलाम ठोकण्याची पद्धत ठाऊक नाही काय? गणवेशाची नामपाटी अशी लावतात काय? गणवेशात असले बूट घालतात का? असे एक नव्हे तर अनेक त्रुटी दाखवून पोलीस महासंचालकांनी पोलिसांची जाहीरपणे खरडपट्टी काढली. अधिकाºयांनाही त्यांनी सोडले नाही. महासंचालकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र स्विकारण्यासाठी जत्रेत चालल्यासारखा एक निरीक्षक चालत येत होता. त्याला केवळ खडसावून महासंचालक थांबले नाहीत तर त्याला चालणे शिकविण्याची सूचनाही त्याच्या अधीक्षकाला केली. गोवा पोलीसाच्या ५७ व्या स्थापनादिनानिमित्त पोलिसांचे मुख्यालयाजवळच्या मैदानत संचालन झाले. संचलनात त्रुटी भरभरून जाणवत होत्या. बँडच्या तालावर पावले पडत होती, परंतु पावलात समानता नव्हती. देहबोली योग्य नव्हती, सर्वांचा गणवेश परीपूर्ण नव्हता, खुद्द महासंचालकांनी तर अधिकाºयांच्या गणवेशात त्रुटी दाखविल्या. एकाही प्लॅटूनच्या कमांडींग अधिकाºयाच्या आज्ञात दम नव्हता. मुख्य कमांडींग अधिकाºयांच्या आज्ञा दमदार होत्या परंतु आज्ञांचे पालन अचूकपणे होत नव्हते. महासंचालकांनी याबाबतीत तीव्र नापसंती व्यक्त केली. अपल्या भाषणातही त्यांनी त्याचा उल्लेख केला. यावेळी कडक शिस्तीचा इशारा देताना मुक्तेश चंदर यांनी शिस्तीच्या बाबतीत खात्याकडून कडक धोरण ठेवले जाईल. शिस्तीच्या बाबतीत तडजोड नाही. पोलीस खाते हेशिस्तीचे खाते असल्यामुळे पोलिसांकडून या बाबतीत सतर्क असणे सक्तीचे आहे असे सांगितले. शिस्तीच्या बाबतीत कठोर ताशेरे ओढतानाच पोलीस खात्याच्या कार्याची स्तुतीही त्यांनी केली. गुन्हयांचा तपास करण्याच्या बाबतीत खात्याकडून सरस कामगिरी बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खात्याचे वेर्णा येथील फॉरेन्सीक प्रयोगशाळाही पूर्णत्वाली  असून त्यातील दोन विभाग हे पूर्णपणे सक्रीय झाल्याचे त्यांनी सांगितले. ही पूर्णपणे सुसज्ज झाल्यानंतर तपासकामे वेगात होणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस