Goa: कला अकादमीच्या फॉल्स सिलिंगचा भाग कोसळला
By पूजा प्रभूगावकर | Updated: April 22, 2024 13:22 IST2024-04-22T13:22:09+5:302024-04-22T13:22:29+5:30
Goa News: काेट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या मंत्री गोविंद गावडे यांचा ताज महाल अर्थात कला अकादमीच्या पहिल्या मजल्याचे फॉल्स सिलिंगचा काही भाग सोमवारी पहाटे कोसळला. यामुळे विरोधकांकडून या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Goa: कला अकादमीच्या फॉल्स सिलिंगचा भाग कोसळला
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - काेट्यवधी रुपये खर्च करुन नुतनीकरण केलेल्या मंत्री गोविंद गावडे यांचा ताज महाल अर्थात कला अकादमीच्या पहिल्या मजल्याचे फॉल्स सिलिंगचा काही भाग सोमवारी पहाटे कोसळला. यामुळे विरोधकांकडून या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नुतनीकरण केलेल्या कला अकादमीचे काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. या कामाच्या दर्जावर विरोधकांनी नेहमीच आरोप केले होते. विधानसभेत ही कला अकादमीचा मुद्दा बराच गाजला होता. त्यामुळे त्यांचे हे आरोप पुन्हा एकदा खरे ठरले का ? असे फॉल्स सिलिंग कोसळल्याने चर्चा सुरु झाली आहे.
कला अकादमीच्या पहिल्या मजल्यावरील फॉल्स सिलिंगचा काही भाग कोसळला. अवकाळी पावसामुळे हे झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु यामुळे कामाचा दर्जा उघड झाला आहे. कला अकादमीच्या नुतनीकरणावर ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.यापूर्वी कला अकादमीचे काम सुरु असताना तेथील खुल्या रंगमंचाचा मोठा स्लॅब कोसळला होता. सुदैवाने त्यावेळी सुरक्षा रक्षक तेथे नव्हते. अन्यथा मोठी अनुचित घटना घडली असती.