गोव्याला प्रामाणिक पक्षाची गरज : केजरीवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 01:06 IST2016-08-21T01:06:24+5:302016-08-21T01:06:24+5:30

गोव्याची जनता भाजपा व काँगे्रसला वैतागली आहे. येथील जनतेला प्रामाणिक राजकीय पक्षाची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी

Goa needs honest party: Kejriwal | गोव्याला प्रामाणिक पक्षाची गरज : केजरीवाल

गोव्याला प्रामाणिक पक्षाची गरज : केजरीवाल

वास्को : गोव्याची जनता भाजपा व काँगे्रसला वैतागली आहे. येथील जनतेला प्रामाणिक राजकीय पक्षाची गरज असल्याचे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी येथे केले. मुरगाव-सडा येथील देवस्थानच्या वर्धापनदिनी सत्कार सोहळ््यात ते बोलत होते. येथील तिरुपती बालाजी देवस्थानच्या वर्धापनदिनी केजरीवाल यांच्या हस्ते ज्येष्ठ भजनी कलाकार सूर्या शेटये व तुकाराम नाईक यांचा सत्कार करण्यात आला. गोव्याची निवडणूक लढविण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेकडे मतांची मागणी केली पाहिजे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.

Web Title: Goa needs honest party: Kejriwal