शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र विशेष: भक्तांची कामनापूर्ती करणारी शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 10:57 IST

श्री कामाक्षीचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देश-विदेशामध्येही स्थायिक आहेत. 

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: फोंडा तालुक्यामध्ये देवी देवतांची मंदिरे असल्यामुळे या तालुक्याला विशेष महत्त्व लाभलेले आहे. महालक्ष्मी देवीमुळे म्हार्दोळ, मंगेश देवामुळे मंगेशी, नागेश देवामुळे नागेशी, रामनाथ देवामुळे रामनाथी, तसेच श्री कामाक्षी देवीमुळे शिरोडा गावाला विशेष महत्त्व व ओळख लाभलेली आहे. फोंडा तालुक्यातील ही मंदिरे केवळ गोव्यात नव्हे तर देश विदेशामध्येही प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेली शिरोडा येथील श्री कामाक्षी देवी आहे. श्री कामाक्षीचे भक्तगण हे केवळ गोव्यातच नसून महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देश-विदेशामध्येही स्थायिक आहेत. 

दर अमावास्येला कामाक्षी देवीच्या मंदिरात अमावास्येला भक्तगणांची सकाळ ते रात्रीपर्यंत अफाट गर्दी असते. काही वर्षांपूर्वी देवस्थानतर्फे अयुतचंडी अनुष्ठान करण्यात आले. त्यानंतर श्री कामाक्षी देवी नवसाला पावणारी म्हणून ख्यातकीर्त झाली. त्यानंतर राज्यातील विविध भागातील लोक आपले दुःख तसेच मनोकामना नवसाच्या रुपाने देवीपुढे मांडतात. आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर पाच अमावास्या किंवा सात अमावास्यांचा नवस फेडतात. अनेक लोक अमावस्येला देवीच्या मंदिराला २१ किंवा २५ प्रदक्षिणा घालण्याचे नवसही बोलतात व त्याप्रमाणे पूर्ण करतात. दर अमावास्येला शिरोड्यात सुमारे ५० हजारच्या आसपास भक्तगण सकाळी ते रात्रीपर्यंत देवदर्शनासाठी येतात. 

अमावास्याप्रमाणे देवीचा नवरात्री उत्सवही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्री उत्सवाला सजवण्यात आलेले मखर अत्यंत आकर्षक असते. सोन्या दागिन्याने नटलेली श्री कामाक्षी देवी मखरात शोभून दिसते. देवी हत्ती, घोडा, सिंह, वाघ, मोर अशा विविध आसनांवर विराजमान होते. नवरात्री उत्सवाला देवीची सेवा, सजावट तीर्थप्रसाद आदीसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कुटुंबांना जबाबदारी दिलेली आहे. देवीचे सर्व भक्तगण एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. याशिवाय जत्रोत्सव, दसरा, कौल देवीची पालखी, पाडव्याला गुलाल उत्सव, अंबारी मिरवणूक, पंचम असे विविध कार्यक्रम देवस्थानात साजरे केली जातात.

टॅग्स :goaगोवाNavratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023Navratriनवरात्री