शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र विशेष: नवरात्रीच्या नवव्या दिवशी नागेश महारुद्र देवाचे ‘म्हाताऱ्या रूपात दर्शन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 09:22 IST

फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

यामिनी मडकईकर, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: फोंडा तालुक्यात अनेक भागात आदीशक्तीची नवदुर्गा, सातेरी, शांतादुर्गा, महालसा, महालक्ष्मी या देवतांंच्या रूपात दर्शन घडवणारी अनेक देवालये आहेत. त्याचप्रमाणे महादेवाचे रूप असलेले कपिलेश्वर, नागेश, मंगेश या देवांची प्रसिद्ध मंदिरेही या महालात आहेत. 

बांदोडा येथील जगप्रसिद्ध नागेश महारुद्र देवस्थान केवळ गोव्यातच नव्हे तर केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गुजरात व अन्य राज्यांमध्येही प्रसिद्ध आहे. फोंडा तालुक्यातील विविध देवस्थानांंप्रमाणे नागेश महारुद्र देवस्थानातही नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

नवरात्री उत्सवात नागेश महारुद्र देव नंदी, मोर, वाघ, सिंह, गरुड अशा आसनांंवर विराजमान होतो.  आठव्या दिवशी देव महारुद्र नवचंडीच्या रूपात पाहायला मिळतो. शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी रात्री देवाला ''जाणता'' म्हणजेच म्हाताऱ्या देवाचे रूप दिले जाते. देवाचे हे रूप पाहण्यासाठी अंत्रुज महालातील अनेक भक्तगण विशेष उपस्थिती लावतात. 

या देवस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचदिवशी रात्री मखर उत्सवाअगोदर देवाचा ‘भस्म लावण्याचा' कार्यक्रम होतो. ज्याप्रमाणे महादेवाच्या कपाळाला भस्म लावतात, त्याचप्रमाणे नागेश महारुद्र देव सुद्धा महादेवाचेच रूप असल्यामुळे त्याचे भस्म लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण उपस्थिती लावतात. त्यानंतर मखरोत्सव होतो.

अन्य देवस्थानांंप्रमाणे या देवस्थानामध्येही नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी व देवीची सेवा करण्यासाठी नऊ दिवस वेगवेगळ्या कुटुंबांना जबाबदारी दिली जाते. यात गावकर कुटुंब, गावचे जोशी पुरोहित, नमशीकर, धायमोडकर, गावणेकर, खंंवटे, सरदेसाई या कुटुंबांंना तसेच कोमुनिदाद, आरकांदेकर आदी कुटुंबांनाही जबाबदारी दिली जाते.

नवरात्री उत्सवानंतर दहाव्या दिवशी रवळनाथ देवाचा अवसर होतो. त्यानंतर चार दिवस विविध कुटुंबांना कौल प्रसाद दिला जातो. देवीचे भक्तगण केवळ गोव्यात नसून कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ  तसेच गुजरात या भागात विखुरलेले आहेत.

नवरात्री जत्रा उत्सवात बांदोडा येथे संस्थानच्या परिसरात राहून देवाची सेवा करतात. संस्थानाकडून देवाचा नवरात्री उत्सव व कार्तिकी पौर्णिमेला जत्रोत्सव होतो. या दिवशी देवीचे कुळावी भक्तगण महिला देवाला दिवजे पेटवतात. याशिवाय अनुष्ठान चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा होतो. दर सोमवारी संस्थानात देवाची पालखी मिरवणूक असते. देव महारुद्र संस्थानचे अध्यक्ष म्हणून दामोदर भाटकर हे सध्या काम पाहतात.

टॅग्स :goaगोवाNavratriनवरात्रीNavratri Mahotsav 2023शारदीय नवरात्रोत्सव 2023