Goa: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण, अधिकाऱ्यांचा दावा

By किशोर कुबल | Published: April 11, 2024 01:40 PM2024-04-11T13:40:28+5:302024-04-11T13:40:41+5:30

Goa News: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या विविध कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सीईओ संजीत रॉड्रिग्ज दिलेल्या माहितीनुसार ९६४७ मीटर मलनिस्सारण वाहिन्यांपैकी ७७६८  मीटर म्हणजेच ८० टक्के पूर्ण झाले आहे.

Goa: More than 90 per cent works under Smart City at Raibandar completed, officials claim | Goa: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण, अधिकाऱ्यांचा दावा

Goa: रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण, अधिकाऱ्यांचा दावा

- किशोर कुबल
पणजी - रायबंदर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेल्या विविध कामांपैकी ९० टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सीईओ संजीत रॉड्रिग्ज दिलेल्या माहितीनुसार ९६४७ मीटर मलनिस्सारण वाहिन्यांपैकी ७७६८  मीटर म्हणजेच ८० टक्के पूर्ण झाले आहे. २८९ मलनिस्सारण ​​ मॅनहोलपैकी २१६ म्हणजेच ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

५२३५ मीटर जलवाहिन्यांपैकी ४२१२ मीटर म्हणजेच ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ९६४७ मीटर स्टॉर्म वॉटर ड्रेनेजपैकी ९३२८ मीटर म्हणजेच तब्बल ९६ टक्के पूर्ण झाले आहे. ५२३५ मीटर रस्त्याच्या बांधकामापैकी ३८६२ मीटर म्हणजे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ८०१२ मीटर हार्डस्केपिंगपैकी ७३५७ मीटर म्हणजे ९२ टक्के पूर्ण झाले आहे.

स्मार्ट सिटीची सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी वेगाने काम चालू असल्याचे सांगण्यात आले. रायबंदर हे एक शाश्वत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहरी केंद्र निर्माण दिले जात आहे.पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये ७५ टक्के ते ९५ टक्केपर्यंत पूर्णत्व प्रगती साधली गेली आहे, असा दावा करण्यात आला.

Web Title: Goa: More than 90 per cent works under Smart City at Raibandar completed, officials claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.