शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गोवा मॉडल देशभर पाेहचविणार; आयव्हीएफ उपचार सेवेचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 17:29 IST

या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर वरिष्ठ डॉक्टरही उपस्थित होते, तसेच या उपचाराचा लाभ घेण्यासाठी काही मुले नसलेली जाेडपीही उपस्थित होती

नारायण गावस - पणजी : गोव्यात माेठ्या प्रमाणात आराेग्य क्षेत्रात क्रांती होत असून, पुढील ६ महिन्यांत गाेवा मॉडेल देशभर प्रसिद्ध हाेणार आहे. गाेव्यात अनेक आधुनिक उपचार पद्धती राबविल्या जाणार आहेत, असे आराेग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. शुक्रवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ मोफत उपचार पद्धतीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बाेलत होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व इतर वरिष्ठ डॉक्टरही उपस्थित होते, तसेच या उपचाराचा लाभ घेण्यासाठी काही मुले नसलेली जाेडपीही उपस्थित होती.

काही अन्य पक्षाचे राजकारणी गोव्यात येऊन दिल्ली मॉडेलचे राजकारण करत आहे; पण गाेवा हे दिल्लीपेक्षा आरोग्य क्षेत्रात खूप पुढे आहे. आयव्हीएफ उपचार मोफत देणारे गाेवा हे पहिले राज्य आहे. फक्त देशातच नाही जगभर हा उपचार कुठेच माेफत दिला जात नाही. या उपचारासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत; पण गाेवा सरकार केंद्र सरकारच्या सहकार्याने गाेव्यात ही उपचार पद्धतीत सुरू केली आहे. फक्त बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात नाही तर आता सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये अशा आधुनिक आराेग्य सुविधा सुरू केल्या जाणार आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

- आयव्हीएफचा मोफत उपचार देणारे पहिले राज्यज्या जाेडप्यांना मुले नाही वंध्यत्वाचा सामना करावा लागतो अशा जोडप्यांच्या चेहऱ्यावर आता हास् फुलणार आहे. आज अनेक जाेडपी या ठिकाणी सरकारच्या आराेग्य क्षेत्रावर विश्वास ठेवून आली आहे. त्यांना नक्कीच या उपचाराचा लाभ हाेणार आहे. या उपचारासाठी खासगी रुग्णालयात जाेडप्यांना उपचारासाठी लाखाला रुपये खर्च करावा लागत होता; पण आता हा उपचार सरकार मोफत देत आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत, तसेच या विषयी जास्त माहिती जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाइन नंबरही दिला जाणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :goaगोवाHealthआरोग्य