गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2024 16:45 IST2024-03-30T16:44:13+5:302024-03-30T16:45:06+5:30
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान
नारायण गावस,पणजी:गोवावैद्यकीयमहाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भानू प्रकाश श्रीवास्तव आणि बीईएलचे संचालक (एचआर) विक्रमन एन यांच्या हस्ते गोवावैद्यकीयमहाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना सुपुर्द केले. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या फिरत्या वाहनामध्ये ॲनालॉग मॅमोग्राफी, डिजिटल एक्स-रे, पोर्टेबल अल्ट्रासाऊंड, डिजिटल ईसीजी, रक्तविज्ञान विश्लेषण, बायोकेमिस्ट्री विश्लेषण, डिजिटल मायक्रोस्कोप आणि रुग्णांची क्रायो सर्जरी प्रदान करेल. हे वाहन म्हणजे एक फिरता दवाखानाच आहे. हे वाहन रुग्णांची कॅन्सरविषयी सुरुवातीची लक्षणे शोधण्यासाठी गावोगाव फिरेल. यामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने अनेक आधुनिक उपचार प्रधान सुरु केले आहे. कॅन्सरवर चाचणाी हे फिरते वाहन म्हणजे आराेग्य क्षेत्रात एक महत्वाचे पाऊल आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने दिलेल्या या वाहनाचा राज्यातील विविध भागात रुग्णांना तपासणीा करुन घेण्यास फायदा होणार आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय कॅन्सर विषय जनजागृता करत आहे. लोकांना या भयानक राेगापासून दूर ठेवण्यासाठी आधुनिक पद्धतीचे उपचार राबिवले जात आहे.