शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

संविधानाचा अपमान; दक्षिण गोव्यातील इंडिया आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध तक्रार

By किशोर कुबल | Updated: April 23, 2024 13:41 IST

Goa Lok Sabha Election 2024: भारतीय राज्य घटनेचा अपमान केल्या प्रकरणी ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्याविरुध्द भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून विरियातोंची उमेदवारी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

- किशोर कुबल पणजी - भारतीय राज्य घटनेचा अपमान केल्या प्रकरणी ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्याविरुध्द भाजप प्रदेशाध्यक्षांची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली असून विरियातोंची उमेदवारी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांकडे केलेल्या तक्रारीसोबत विरियातो यांच्या आक्षेपार्ह भाषणाची व्हिडिओ क्लीपही जोडली आहे. पत्रकार परिषदेत आमदार दिगंबर कामत यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी माजी आमदार तथा पक्षाचे सरचिटणीस दामू नाईक, माजी मंत्री तथा उपाध्यक्ष दिलिप परुळेकर व आमदार ग्लेन तिकलो तिकलो उपस्थित होते.

कामत म्हणाले की, ‘विरियातो यांचे हे विधान राष्ट्रविरोधी आहे. उमेदवारी अर्ज भरताना भारतीय घटनेचा आदर करीन, अशी शपथ प्रत्येक उमेदवार घेत असतो. परंतु विरियातो यांनी ही शपथ तोडली आहे.  १९६१ साली गोवा मुक्त झाला तेव्हा भारतीय घटना गोमंतकीयांच्या माथी मारली, हे त्यांचे विधान आक्षेपार्ह आहे. त्यावेळी पं. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान होते. कॉग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट करावी. विरियातो यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान केला आहे.’

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४south-goa-pcदक्षिण गोवाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपा