शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Goa: नाराजांची समजूत घालण्याची भाजपची मोहीम जोरात, दीपक पाऊस्कर यांचाही भाजपला पाठिंबा 

By वासुदेव.पागी | Updated: May 4, 2024 16:04 IST

Goa Lok Sabha Election 2024: माझी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पल्लवी धेम्पे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सावर्डे मतदारसंघातील आमदार गणेश गावकर यांनी शनिवारी पाऊसकर यांची भेट घेतली.

 - वासुदेव पागीपणजी - माझी मंत्री दीपक पाऊस्कर यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवार पल्लवी धेम्पे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.  मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि सावर्डे मतदारसंघातील आमदार गणेश गावकर यांनी शनिवारी पाऊसकर यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूने प्रचार कामात मुसंडी मारताना दुसऱ्या बाजूने पक्षावर नाराज असलेले पक्षाचे आजी-माजी नेते यांना भेटून त्यांना राजी करण्याचा सपाटा भाजपने चालविला आहे. शनिवारी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत  यांनी सावर्डे चे आमदार गणेश गावकर यांच्यासह पाऊस कर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल अद्याप काहीच बाहेर आलेले नाही मात्र पाऊसकर हे भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांच्यासाठी काम करण्यास राजी झाले आहेत. आपला पाठिंबाही त्यांनी भाजप उमेदवाराला जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉक्टर सावंत आणि आमदार गावकर यांच्याबरोबर त्यांनी एकत्र फोटोही दिला आहे. काँग्रेसचा दक्षिणेकडील गड असा मानला जाणारा मुरगाव मतदारसंघ यावेळी सर करण्यासाठी  भाजपने आपली प्रतिष्ठा पणास लावली आहे.

त्यासाठी पक्षाकडून कोणतीही कसर सोडली जात नाही. काही दिवसांपूर्वी डॉक्टर सावंत यांनी काणकोणचे माजी आमदर इजिदोर फर्नांडिस यांची भेट घेऊन त्यांनाही प्रचार कार्यात सामील करून घेतले होते. उत्तर गोव्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे पूर्वीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीही भाजपाचे अध्यक्ष सदानंद शेट तनावडे आणि स्वतः उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भेट घेतली होती. काही कारणामुळे पक्ष सोडलेल्या, पक्षापासून दूर गेलेल्या, रुसलेल्या, नेत्यांना जवळ आणण्याचा सपाटा पक्षाने चालविला असून त्यात पक्षाला यशही मिळताना दिसत आहे.

टॅग्स :goa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४