शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

गोव्यात शहरीकरण झालेल्या गावांमधील निम्म्या बार, मद्य दुकानांना दिलासा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 13:13 IST

गोव्यात बारमालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून शहरीकरण झालेल्या गावांमधून जाणाऱ्या महामार्गालगतची सध्या बंद असलेल्या १३३२ मद्य आस्थापनांपैकी निम्मी आस्थापने पूर्ववत खुली करण्यासाठी लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. 

पणजी : गोव्यात बारमालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून शहरीकरण झालेल्या गावांमधून जाणाऱ्या महामार्गालगतची सध्या बंद असलेल्या १३३२ मद्य आस्थापनांपैकी निम्मी आस्थापने पूर्ववत खुली करण्यासाठी लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. गावांमधून जाणाऱ्या हायवेलगतच्या बंद असलेल्या मद्य आस्थापनांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा, महसूलमंत्री रोहन खंवटे, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती स्थापन केलेली आहे. या समितीची पहिली बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या असून शहरांपासून जवळ असलेले गाव ज्यांचे शहरीकरण झालेले आहे, अशा गावांमधील बार खुले करण्याची परवानगी सरकारकडून दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांना निवाड्याव्दारे दिलासा दिलेला आहे. विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा, सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे त्यामुळे बार्रांचे मालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांमध्ये आशेचा किरण निर्माण झालेला आहे. गोव्यात मद्य स्वस्त मिळत असल्याने देशभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देत असतात. शेजारी महाराष्ट्र, कर्नाटकातील पर्यटकांची संख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत लक्षणीय वाढते. किनाºयांवरील शॅकमध्येही तुडुंब गर्दी असते. सध्या देशी पर्यटकांचा मोसम असून लवकरात लवकर जर का सरकारकडून परवानगी मिळाली तर या मोसमात थोडेफार आर्थिक उत्पन्न होईल या आशेवर मद्य व्यावसायिक आहेत. राजधानी शहरापासून जवळ असलेले पर्वरी तसेच अन्य भागांचे शहरीकरण झालेले आहे. या भागातील मद्य आस्थापनांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उसगांव, खांडेपार, धारबांदोडा, मोलें, पोळें, धारगळ या भागात जास्तीत जास्त मद्य आस्थापने आहेत. राज्यात राष्ट्रीय महामार्ग पुढीलप्रमाणे जातात. एनएच १७ - पेडणे, म्हापसा, पणजी, मडगांव, कुंकळ्ळी, काणकोण असा आहे. एनएच १७ ब - वेर्णा, दाबोळी, वास्को असा आहे. एनएच ४ अ - पणजी, जुने गोवे, फोंडा, मोलें महामार्गावर जुने गोवें तसेच म्हार्दोळ, कुंडई, तिस्क, उसगांव व मोलेपर्यंत आहे. अस्नोडा-कासारपाल- दोडामार्ग, साखळी-पर्यें-केरी-चोर्ला, बोरी-शिरोडा-पंचवाडी-सावर्डे-सांगे-पाटयें, धारबांदोडा-सावरगाळ-सावर्डे-कुडचडें, मडगांव-नेसाय-सां जुझे आरियल-चांदोर-कुडचडें, कुचेली-थिवी-अस्नोडा-मुळगांव-डिचोली-साखळी-होंडा-वाळपई, होंडा-वेळगें-पाळी-उसगांव-पिळयें आणि  फोंडा-बोरी-राय-आर्लेम्-मडगांव हे आठ राज्य महामार्ग आहेत. पालिका क्षेत्रांमधील बार तसेच मद्य विक्री करणारी दुकाने याआधी खुली झालेली आहेत.