Goa: सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने
By पूजा प्रभूगावकर | Updated: August 29, 2023 16:58 IST2023-08-29T16:58:31+5:302023-08-29T16:58:52+5:30
Goa: किमान वेतनात अल्प अशी वाढ करून सरकारने कामगारांची फसवणूक केली आहे.सरकारने दिलेले किमान वेतन वाढ आम्हाला अमान्य असल्याचे म्हणत कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर आयटकच्या बॅनरखाली जोरदार निदर्शने केली.

Goa: सरकारने कामगारांची केली फसवणूक: किमान वेतनवाढ अमान्य: कामगारांची पणजीत निदर्शने
- पूजा प्रभूगावकर
पणजी - किमान वेतनात अल्प अशी वाढ करून सरकारने कामगारांची फसवणूक केली आहे.सरकारने दिलेले किमान वेतन वाढ आम्हाला अमान्य असल्याचे म्हणत कामगारवर्गाने पणजी येथील आझाद मैदानावर आयटकच्या बॅनरखाली जोरदार निदर्शने केली.
सरकारने किमान वेतनात केवळ १०० रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे ती आम्हाला अमान्य आहे. सरकारने अकुशल कामगारांना प्रतिमहिना किमान वेतन २५ हजार, तर कुशल कामगारांना किमान वेतन ३५ हजार रुपये मिळायलाच पाहिजे. कामगारांवर अन्याय कदापि सहन करणार नसल्याचा इशारा आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.
फोन्सेका म्हणाले, की किमान वेतनात सरकारने १०० रुपयांची वाढ केली. इतकी महागाई असताना अल्पवाढ करणे म्हणजे कामगारांची थट्टाच आहे. केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली येथे कामगारांना समान काम, समान वेतन या तत्त्वावर वेतन दिले जाते. या तिन्ही राज्यांच्या तुलनेत गोव्यात राहणीमान महाग आहे. ८ ते १० हजार रुपये पगारात घर चालवणे कठीण होत आहे. भांडवलदार सरकारला हाताशी धरून कामगारांचा आवाज दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला.