शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

गोवा सरकारचे खातेवाटप जाहीर, जेनिफर पहिल्या महिला आयटी मंत्री, माविन व विश्वजितचे खाते बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 20:55 IST

राज्यातील चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खात्यांचे वाटप केले. नव्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान खाते जेनिफर मोन्सेरात यांना मिळाले आहे.

पणजी - राज्यातील चारही नव्या मंत्र्यांना सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खात्यांचे वाटप केले. नव्या मंत्रिमंडळात माहिती व तंत्रज्ञान खाते जेनिफर मोन्सेरात यांना मिळाले आहे. श्रीमती मोन्सेरात ह्या गोव्याच्या पहिल्या महिला आयटी मंत्री ठरल्या आहेत. लोबो यांना कचरा व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान ही खाती देऊन मुख्यमंत्र्यांनी खूष केले तर माविन गुदिन्हो व विश्वजित राणो या दोन मंत्र्यांची खाती बदलून त्यांना प्रत्येकी एक नवे खाते दिले. खाते वाटपाची अधिसूचना सोमवारी दुपारी जारी झाली. मोन्सेरात यांच्यासह बाबू कवळेकर, मायकल लोबो आणि फिलिप नेरी रॉड्रीग्ज या चौघा मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी झाला होता. चौघापैकी तिघेजण काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना नगर नियोजन, कृषी, कारखाने व बाष्पक अशी खाती दिली गेली आहेत. श्रीमती मोन्सेरात यांना आयटी, महसुल, मजुर व रोजगार ही खाती दिली गेली तर फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांना मच्छीमार आणि जलसंसाधन ही खाती मिळाली आहेत. लोबो यांना बंदर कप्तान, विज्ञान व तंत्रज्ञान आणि घन कचरा व्यवस्थापन, ग्रामीण विकास यंत्रणा ही खाती मिळाली आहेत.वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडील पशूसंवर्धन खाते मुख्यमंत्र्यांनी काढून घेऊन ते स्वत:कडे ठेवले तर आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांच्याकडील कायदा खाते काढून ते वीज मंत्री निलेश काब्राल यांना दिले आहे. मंत्री राणो यांच्याकडे अवघ्याच दिवसांपूर्वी कायदा व न्याय खाते दिले गेले होते. निलेश काब्राल त्यामुळे खूप नाराज होते. आपल्याकडील कायदा खाते का काढले ते आपल्याला ठाऊक नाही असे यापूर्वी मंत्री काब्राल बोलत होते. त्यांना पुन्हा कायदा खाते देताना मुख्यमंत्री सावंत यांनी विश्वजित राणो यांना कौशल्य विकसन हे खाते दिले. माविन गुदिन्हो यांच्याकडील पशूसंवर्धन खाते मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतले तर माविनला गृहनिर्माण हे अतिरिक्त खाते दिले. पूर्वी विजय सरदेसाई यांच्याकडे जी खाती होती, ती सगळी खाती कवळेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. मंत्री  मुख्यमंत्री प्रमोद सावंत - गृह, पर्सनल, दक्षता, अर्थ, सर्वसाधारण प्रशासन व इतर बाबू कवळेकर - नगर नियोजन, कृषी, पुरातत्त्व, पुराणवस्तू, कारखाने व बाष्पक  बाबू आजगावकर - पर्यटन, क्रिडा, राजभाषा, सार्वजनिक गा:हाणी, प्रिंटिंग व स्टेशनरी जेनिफर मोन्सेरात - महसुल, आयटी, मजुर व रोजगार गोविंद गावडे - कला व संस्कृती, अनुसूचित जमात, नागरी पुरवठा, सहकार फिलिप नेरी रॉड्रीग्ज - जलसंसाधन, मच्छीमार, वजन व माप मायकल लोबो - कचरा व्यवस्थापन, विज्ञान तंत्रज्ञान, बंदर कप्तान, ग्रामीण विकास माविन गुदिन्हो - वाहतूक, पंचायती राज, गृहनिर्माण, शिष्टाचार, विधिमंडळ व्यवहार विश्वजित राणे -  आरोग्य, उद्योग व वाणिज्य, महिला व बाल कल्याण, स्कील डेव्हलपमेन्ट मिलिंद नाईक - नगर विकास, समाज कल्याणस्, नदी परिवहन, प्रोव्हेदोरिया निलेश काब्राल - वीज, पर्यावरण, कायदा व न्याय, अपारंपरिक उर्जा ोत दीपक प्रभू पाऊसकर - सार्वजनिक बांधकाम, टेक्सटाईल व कॉयर

टॅग्स :goaगोवा