Goa: जयपूर येथील जीआयटीबी २०२४ मधे गोवा पर्यटनाचा उत्साही सहभाग
By समीर नाईक | Updated: May 9, 2024 15:47 IST2024-05-09T15:47:03+5:302024-05-09T15:47:26+5:30
Goa News: जयपूर, राजस्थान येथे द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार (जीआयटीबी) २०२४ या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोवा पर्यटन विभागाचा सहभाग प्रभावशाली ठरला. ५ ते ७ मे, दरम्यान आयोजित या कार्यक्रमात जगभरातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हॉटेल मालक आणि इतर प्रभावशाली भागधारक एकत्र आले होते.

Goa: जयपूर येथील जीआयटीबी २०२४ मधे गोवा पर्यटनाचा उत्साही सहभाग
- समीर नाईक
पणजी - जयपूर, राजस्थान येथे द ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बझार (जीआयटीबी) २०२४ या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोवापर्यटन विभागाचा सहभाग प्रभावशाली ठरला. ५ ते ७ मे, दरम्यान आयोजित या कार्यक्रमात जगभरातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, हॉटेल मालक आणि इतर प्रभावशाली भागधारक एकत्र आले होते.
जीआयटीबीमध्ये, गोवापर्यटन विभागाचे दालन एक केंद्रबिंदू ठरले. समुद्र किनारे आणि त्यांच्याशी संलग्न सुविधा, खेळ व त्या सोबत समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि मनोरंजनाची साधने यांच्यासह, गोवा पर्यटन विभागाने जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित केले. राज्य पर्यटन विभागाच्या शिष्टमंडळात विभागाचे सचिव संजीव अहुजा, उपसंचालक धीरज वागळे, व्यवस्थापक विपणन अक्षय गोवेकर, व इतर अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
गोव्याच्या दलनाने उपस्थित सर्वांवर आपली छाप टाकली आणि राज्याच्या अनोख्या सवलातींकडे लक्ष वेधले. यावेळी भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याकडे पाहिले जात होते. प्रदर्शनात गोवा पर्यटनाच्या दालनात राज्यातील केवळ नयनरम्य समुद्रकिनारे आणि प्राचीन संस्कृतीचेच नव्हे तर पुनर्योजी पर्यटनासाठीची राज्याची बांधिलकी देखील दाखवून दिली. व्हर्च्युअल रिॲलिटी (व्हीआर) आणि इंटरएक्टिव्ह स्क्रीन्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, अभ्यागतांना गोव्याच्या निसर्गरम्य आणि सांस्कृतिक रत्नांचा अनुभव घेता आला.
अशा प्रदर्शनी आणि कार्यक्रमात सहभाग घेऊन गोव्याचे भारतातील पहिले पुनर्योजी पर्यटनाचा मागोवा घेणारे राज्य म्हणून स्थान अधोरेखित होते. या प्रसंगी आम्ही महत्त्वाच्या भागधारकांशी संवाद साधला, त्यांच्या सहभाग करण्याच्या संधी पडताळून पाहिल्या. तसेच विवाह, वाढदिवस या सारख्या कार्यक्रमांसाठी आणि आध्यात्मिक पर्यटनासाठी गोवा कसे योग्य आहे हे देखील यावेळी अधोरेखित झाले, असे पर्यटन विभागाचे सचिव संजीव अहुजा यांनी सांगितले.