Goa: गोव्यात महागडी दारू होणार स्वस्त, अबकारी करात कपात, ११ नोव्हेंबरपासून नवे दर
By वासुदेव.पागी | Updated: October 29, 2023 00:13 IST2023-10-29T00:12:18+5:302023-10-29T00:13:01+5:30
Goa News:

Goa: गोव्यात महागडी दारू होणार स्वस्त, अबकारी करात कपात, ११ नोव्हेंबरपासून नवे दर
- वासुदेव पागी
पणजी : पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात महागड्या विदेशी दारुच्या ब्रँडवरील कर आकारणीत कपात करण्यात आली आहे. त्यामुळे १२०० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या ब्रँडच्या दारू आता स्वस्त होणार आहेत.
गोव्यात येणारे विदेशी पर्यटक हे हायब्रॅण्ड दारूला पसंती देतात. ती दारू इतर ठिकाणाहून आणली जाते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांना तोटा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यावर विधानसभेतही चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, महागड्या दारुच्या अबकारी करात कपात केली असली तरी स्वस्त दारुच्या अबकारी करात वाढ केल्यामुळे काही व्यावसायिक नाराज आहेत. कमी किंमतीच्या दारुवर कर वाढविल्यामुळे स्थानिकांना फटका बसणार असल्याचे गोवा लिकर्स ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी म्हटले आहे.
नवीन कर
१०५० रु. ते २२०० रुपयांपर्यंतच्या ब्रँडचे दर ५० ते ६० रुपये उतरणार. २२०० ते ३७०० रुपयांच्या ब्रँडवर १०० ते १५० रुपये उतरणार. ३७०० ते ५२०० पर्यंतच्या ब्रँडवर ४०० रुपये उतरणार. तसेच ५२०० रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या ब्रँडवर ७५० रुपये उतरणार आहेत. मात्र नव्या दरांनुसार १०५० रुपये व त्या पेक्षा कमी किंमतीच्या ब्रँडसाठी ३० रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. नवीन करप्रणाली अधिसुचनेच्या तारखेपासून १५ दिवसांनी म्हणजे ११ नोव्हेंबरपासून अंमलात येणार आहे.