शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री महादेव नाईक यांचा भाजपाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 19:18 IST

माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. ते रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत.

ठळक मुद्देमाजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. ते रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत.नाईक दोनवेळा जिंकले तेव्हा त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. 90 च्या दशकात नाईक हे काँग्रेसचे सदस्य होते. आता त्यांची काँग्रेस पक्षात घरवापसी होईल.

पणजी - माजी उद्योग मंत्री महादेव नाईक यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला आहे. ते रविवारी काँग्रेस पक्षात रितसर प्रवेश करणार आहेत.

नाईक यांच्या घरी जाऊन शुक्रवारी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली व काँग्रेसमध्ये प्रवेश करावा अशी विनंती केली. आपण त्यानुसार रविवारी प्रवेश करणो निश्चित केले आहे. तत्पूर्वी लगेच आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहे, असे नाईक यांनी लोकमतला सांगितले. नाईक यांचा 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी ते दोनवेळा शिरोडय़ात सुभाष शिरोडकर यांचा पराभव करून निवडून आले. नाईक दोनवेळा जिंकले तेव्हा त्यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यापुढे पोटनिवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्ष तिकीट देण्याची शक्यता आहे. 90 च्या दशकात नाईक हे काँग्रेसचे सदस्य होते. आता त्यांची काँग्रेस पक्षात घरवापसी होईल.

आपण पक्षात प्रवेश केल्यानंतर मग तिकीट कुणाला द्यायचे ते पक्ष ठरवेल. अजून काही ठरलेले नाही, असे नाईक यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, की शिरोडा मतदारसंघात जे सुभाष शिरोडकर यांच्याविरोधात लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्या सर्वानी अगोदर काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असा आमचा प्रस्ताव आहे. मगो पक्षाचे उमेदवार वगळता आम्ही अन्य सर्व इच्छुकांना प्रस्ताव दिला आहे. आम्ही प्रत्येकाला जाऊन भेटत आहोत. तुकाराम बोरकर व डॉ. सुभाष प्रभुदेसाई यांनाही मी भेटणार आहे. अगोदर काँग्रेसमध्ये या, काँग्रेसचे सदस्य व्हा आणि मग एकत्र बसून तिकीट कुणाला ते ठरवूया. एकदा तिकीट निश्चित झाल्यानंतर सर्वानी मिळून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करावे असे आम्हाला अपेक्षित आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारणcongressकाँग्रेस