शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: डबल इंजिन सरकारने गोव्यासाठी काय केले? तृणमूलचा पंतप्रधान मोदींना खरमरीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:05 IST

Goa Election 2022: गोव्यातील प्रत्येक मुद्द्यावर, धोरणाबाबत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा भेटीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या गोव्याच्या सहप्रभारी सुष्मिता देव यांनी 'भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासाठी काय केले?' असा खरमरीत प्रश्न पंतप्रधानांना विचारला आहे. पणजी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर  त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी  गोवा तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र काकोडकर आणि महिला विभागाच्या उपाध्यक्षा प्रतिभा बोरकर उपस्थित होत्या.

सुष्मिता देव यांनी गोव्यातील जनतेने दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल आभार मानले.‘गेल्या साडेचार महिन्यांत 'टीएमसी'ला मोठा पाठिंबा मिळाला आहे. खाणकाम असो किंवा तीन रेषीय प्रकल्प असो, बेरोजगारी असो, मुरगाव पोर्ट ट्रस्टचे पोर्ट अथॉरिटीमध्ये रूपांतर  झालेले असो, प्रत्येक मुद्द्यावर धोरणाबाबत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे.’

केंद्रातील तसेच राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधत सुष्मिता देव म्हणाल्या, ‘पंतप्रधान मीडियाला सामोरे जाणार नाहीत, परंतु 'टीएमसी'ला साध्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तुमच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासाठी काय केले आहे? तुमच्या दुहेरी इंजिन सरकारने ३ रेषीय प्रकल्प दिले आहेत जे गोव्यातील परिसंस्थेबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. आज ६०८ कोटी रुपये अंदाजे खर्चून पणजी स्मार्ट शहरांपैकी एक होईल, असे सांगणाऱ्या या दुहेरी इंजिनच्या सरकारने सध्या १६ कोटी रुपये खर्च केले आणि तेही सौंदर्यीकरणासाठी. 

आज मला या डबल इंजिन सरकारला विचारायचे आहे की, राज्यपाल पदावर असलेल्या एका व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाई का झाली नाही? लसीकरणाची बढाई मारणाऱ्या या डबल इंजिन सरकारला आम्ही विचारू इच्छितो की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ३ दिवसांत ८० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी काय केले? या दुहेरी इंजिन सरकारने असे केले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या दुप्पट दराची हमी दिली आहे.’’ काँग्रेस-भाजपच्या संगनमतावर निशाणा साधत राजेंद्र काकोडकर म्हणाले की, आमदारांचा पुरवठा आणि खरेदी, भ्रष्टाचार आणि जुमल्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून आहेत.

 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस