शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: हा केवळ जाहीरनामा नाही, तर २०३५ पर्यंतचे ध्येय; काँग्रेसची गोवेकरांना ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 17:18 IST

Goa Election 2022: यंदाच्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंंग्रेस किमान २४ ते २६ जिंंकणार असा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :  काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी केवळ जाहीरनामा प्रसिद्ध केला नसून ते २०३५ पर्यंंत गोव्यासाठीचे ध्येय आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत येताच दर सहा महिन्यांंनी या जाहीरनाम्यातील आश्वासांंची पूर्तता होत आहे का याचा आढावा घेतला जाईल, असे जाहीरनामा समितीचे प्रमुख ॲड. रमाकांंत खलप यांंनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मांंडवीतील कॅसिनो ही गोव्याला भेडसावणारी समस्या आहे. मात्र अचानकपणे मांंडवीतून कॅसिनो हटवणे शक्य नाही. त्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे. गेमिंंग कमिशन व  नियामक संस्था स्थापन तसेच योग्य तो अभ्यास करूनच कॅसिनो या विषयावर तोडगा काढणे शक्य असल्याचे त्यांंनी स्पष्ट केले.ॲड. खलप म्हणाले, की काँग्रेस पक्षाने जनतेला केवळ आश्वासने द्यायला हवीत म्हणून दिलेली नाहीत. ज्या आश्वासनांंची पूर्तता होऊ शकते तीच जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिली आहेत.

सदर जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नसून २०३५ पर्यंंत गोव्यासाठी ठेवलेले ध्येय आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांंची पूर्तता होते याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. गोव्याची जनता ही समाधानी तसेच स्वानंंदी राहावीत यासाठी या जाहीरनाम्यात तरतूद केली आहे. सध्या भाजप सरकारकडून गोव्यात ज्या योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी बहुतेक योजना या काँग्रेसच्या काळातच सुरू केल्या हाेत्या. भाजपने केवळ त्यात किंंचित बदल केला असल्याचे त्यांंनी सांगितले. यावेळी गोवा कॉंंग्रेसचे  निवडणूक प्रभारी पी. चिदंंबरम, प्रभार दिनेश गुंंडू राव, प्रदेशाध्यक्ष  गिरीश चोडणकर व अन्य हजर होते.

भाजपविरोधी मते फुटणार नाहीत याची खात्री

जनता काँग्रेसकडे पर्याय म्हणून पहात आहेत. त्यामुळे कॉंंग्रेस या निवडणुकीत किमान २४ ते  २६ जिंंकणार असा विश्वास आहे. पक्षाने  निवडणुकीत  ३७ उमेदवार उभे केले असून, त्यापैकी ३१ चेहरे हे नवे आहेत. भाजपविरोधी मते फुटणार नाही याची खात्री असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांंनी सांगितले.

कायदेशीर खाणी सुरू करू

काँग्रेस सरकार सत्तेत येताच गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू केला जाईल, सरकार स्थापनेच्या एका महिन्याच्या आत त्यासाठीची सर्व प्रक्रिया सुरू केली जाईल. कायदेशीर खाण व्यवसायासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे पी. चिदंंबरम यांनी सांंगितले. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरम