शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022: बाबूश मोन्सेरात दाम्पत्याचा विचित्र योगायोग; उमेदवारी जाहीर अन् खटलाही सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 09:35 IST

Goa Election 2022: भाजपचे उमेदवार मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध गोव्यातील म्हापसा सीबीआय न्यायालयात खटला सुरू होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपले ३४ उमेदवार जाहीर केल्यानंतर रुसवे फुगवे उफाळून आले आहेत. उमेदवारी मिळालेले खूश झाले; परंतु आमदार बाबूश मोन्सेरात आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या बाबतीत उमेदवारी मिळूनही आनंद  साजरा करण्याची स्थिती राहिली नाही, उत्पल पर्रीकर यांच्या बंडखोरीमुळे नव्हे, तर सीबीआय न्यायालयात त्यांच्याविरुद्ध आजपासून सुरू होणाऱ्या खटल्यामुळे. 

पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरण इतिहास जमा झाले असले तरी त्या प्रकरणात बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात आणि इतरांविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे आणि त्यानंतरचे खटले त्यांची पाठ सोडत नाहीत. आरोपपत्र दाखल करण्यात आल्यांतरही हे आरोपपत्र रद्द करण्यात यावे अशी मागणी उभयतांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात  केली होती. त्यांना अंतरिम दिलासा देताना खंडपीठाने काही काळासाठी सुनावणी स्थगित केली होती. परंतु हा अंतरिम दिलासाच त्यांना अधिक महागात पडला. कारण त्यांचा अर्ज खंडपीठाने फेटाळला आणि त्यांच्यावर खटला चालविण्याचा आदेश दिला. हा खटला बरोबर निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झाला. शुक्रवारी मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध म्हापसा येथील सीबीआय न्यायालयात सुरू होत आहे. महत्त्वाचे म्हणजे बाबूश आणि जेनिफर यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे. 

२००८ सालच्या या गुन्ह्यासाठी मोन्सेरात दाम्पत्यासह इतर ३५ जणांविरुद्धही खटला चालणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलीस ठाण्यावर हल्ला झाला त्यावेळी मोन्सेरात हे काँग्रेसमध्ये होते आणि आज त्यांच्यावर खटला सुरू होत आहे तेव्हा ते भाजपत आहेत. मोन्सेरात यांच्याबरोबरच त्यांचे त्यावेळचे सहकारी माजी महापौर उदय मडकईकर आणि टोनी रॉड्रिगीश हेही त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्याविरुद्धही खटला चालणार आहे. परंतु, आज ते दोघेही ते काँग्रेसमध्ये दाखल होऊन मोन्सेरात दाम्पत्याविरुद्ध प्रतिस्पर्धी म्हणून लढणार आहेत. 

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाCBIगुन्हा अन्वेषण विभाग