शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : भाजपमधील सिद्धेश नाईकांचे बंड मावळले; अखेर प्रदेश सचिवपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 18:23 IST

Goa Election : उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका, तानावडे यांचं वक्तव्य.

पणजी : कुंभारजुवेत सिद्धेश नाईक यांचे बंड अखेर मावळले आहे. भाजपने त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली असून वास्को मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर कुंभारजुवेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या उपस्थितीत सिद्धेश यांनी आपण पक्षासोबतच राहाणार असल्याचे स्पष्ट केले. सिद्धेश यांनी अखेर तलवार म्यान केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारी दिले होते. भाजपने त्यांचे मन वळविण्यात यश मिळवले आहे. पत्रकार परिषदेत सिद्धेश यांनी कुंभारजुवेत आपण पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासोबत असेन असे जाहीर केले.

बुधवारी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताच भाजपमधील बंडाळी उफाळून आली होती. कुंभारजुवेत केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जि.प. सदस्य सिद्धेश यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती. कार्यकर्त्यांची त्यांनी बैठक घेतली, तेव्हा अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा आग्रह त्यांनी त्यांच्याकडे धरला होता. परंतु सिद्धेश यांचे मन वळविण्यात भाजप नेत्यांना यश आले.

भाजपने कुंभारजुवेत विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जेनिता यांना भाजपने तिकीट दिले आहे. जेनिता पक्षाच्या राज्य सचिव आहेत. तसेच जुने गोवेच्या सरपंच आहेत. सिद्धेश हे या मतदारसंघात भाजप तिकिटाचे प्रबळ दावेदार होते. प्रदेशाध्यक्ष तानावडे म्हणाले की, सिद्धेश यांनी तिकीट मागण्यात काही गैर नाही. श्रीपाद नाईक यांचे पुत्र म्हणून ते पुढे आलेले नाहीत तर अभाविपवर त्यांनी काम केले आहे. पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या निभावल्या आहेत, त्यामुळे आता त्यांची सचिवपदी नियुक्ती करून वास्को मतदारसंघाची जबाबदारी आम्ही सोपविली आहे.

मडकईकरांच्या वक्तव्याची गंभीर दखलसिद्धेश अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास ५०० मतेसुध्दा मिळवू शकणार नाहीत, असे जे विधान पांडुरंग मडकईकर यांनी केले होते, त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली. अशा प्रकारची विधाने करू नका, असे आपण मडकईकर यांना बजावले आहे, असे तानावडे यांनी सांगितले. बहुतांश ठिकाणी बंड मावळले आहे. सांताक्रुझमध्ये अनिल होबळे व गिरीश उस्कैकर यांचा विरोध मावळल्याचा दावा तानावडे यांनी केला.

'उत्पल पर्रीकर, सिद्धेश यांची तुलना नको'

उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश यांची तुलना करू नका. सिद्धेश यांनी विद्यार्थी चळवळीपासून अनेक पदांवर पक्षासाठी काम केलेले आहे, असे तानावडे म्हणाले. सिद्धेश म्हणाले की, ‘पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडीन. वास्को मतदारसंघात काम करीन.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर