शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Goa Election 2022 : शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीसोबत मिळून देणार भाजपला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:23 IST

Goa Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा. उत्पल पर्रीकरांबाबतही केलं मोठं वक्तव्य.

गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष युती करणार आहेत. शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युती करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. यानंतर आता शिवसेनेनं निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना गोव्यात १२ जागांवर लढणार असून संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पहिल्या ९ उमेदवारांची घोषणा केली.

संजय राऊत यांनी शुक्रवारी ९ नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसंच उर्वरित तीन जागांबद्दल शनिवारी सांगण्यात येणार असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. आम्ही संबंधित मतदारसंघातील सामान्य चेहऱ्यांना संधी दिली आहे. गोव्यातील जनता शिवसेनेला संधी देईल अशी खात्री आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेतेही गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही या ठिकाणी प्रचाराकरिता येणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.गोव्याच्या राजकारणार शिवसेना नवीन नाही. आम्ही २०१७ मध्येही गोव्यातील निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी वातावरण गढूळ झालंय. अनेक राजकीय पक्ष नव्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतंय हेदेखील स्पष्ट होत नसल्याचं राऊत म्हणाले.मन वळवण्याचा प्रयत्न करूपणजीतून उत्पल पर्रीकरांना भाजपनं तिकीट नाकारलं आहे. कोणाला तिकीट द्यायचं हा भाजपचा प्रश्न आहे. उत्पल पर्रीकरांवर भाजपकडून होत असलेला अन्याय गोव्याची जनता पाहत आहे. मनोहर पर्रीकरांचं गोव्यासाठी मोठं योगदान आहे आणि हे गोव्याची जनता विसरली नाही. भाजपनं आपण जिंकू या भ्रमात राहू नये, असं राऊत म्हणाले. उत्पल पर्रीकर यांना स्वतंत्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इतर पक्षांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोणाला कोणत्या मतदारसंघातून संधी?

पेडणे - सुभाष केरकर

म्हापसा - जितेश कामत

शिवोली - विल्सेट परेरा

हळदोणे - गोविंद गोवेकर

पणजी - शैलेश वेलिंगकर

पर्ये - गुरुदास गावकर

वास्को - मारुती शिरगावकर

केपे - अ‍ॅलेक्स फर्नांडिस

वाळपई - देवीदास गावकर

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Sanjay Rautसंजय राऊतUtpal Parrikarउत्पल पर्रिकर