शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

Goa Election 2022 : दर महिन्याला गरीबांच्या खात्यात ६ हजार रुपये, 'न्याय योजना' आणण्याचं राहुल गांधींचं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 19:03 IST

Goa Election 2022 : राहुल गांधीनी दिलं जनतेला आश्वासन. व्हर्च्युअल रॅलीदरम्यान भाजपवरही साधला निशाणा.

Goa Election 2022 : सध्या गोवा विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Election) बिगुल वाजलं आहे. दरम्यान, सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही पाहायला मिळत आहे. काँग्रेचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी शुक्रवारी गोव्यात एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच सत्तेत आल्यास गोव्यात 'न्याय योजना' लागू करणार असल्याची घोषणाही केली. 

"आम्ही सत्तेत आल्यास गोव्याच्या लोकांसाठी न्याय योजना आणू. याअंतर्गत दर महिन्याला गोव्यातील सर्वात गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात ६ हजार रुपये टाकले जातील. यानुसार वर्षाला ७२ हजार रुपये तुमच्या खात्यात येतील," असं आश्वासन राहुल गांधींनी जनतेला दिलं. आमचं संपूर्ण ध्येय रोजगाराची निर्मिती करण्यावर असेल. कशाप्रकारे रोजगार निर्माण केले जातात याची आम्हाला कल्पना आहे. काँग्रेस हे गोष्ट समजते. आम्ही हे केलंही आहे. आम्ही पुन्हा एकदा हे तुम्हाला करून दाखवू असंही ते म्हणाले. गोव्यात भाजप पर्यटन, कोरोना आणि रोजगार या सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे, ज्या लोकांनी दगाबाजी केली त्यांना तिकिट न देण्याचा यावेळी काँग्रेसनं निर्णय घेतला आहे. यावेळी आम्ही नव्या लोकांना तिकिट दिलंय. पूर्ण बहुमतात गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वासही राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केला. गोव्यात केवळ भाजप आणि काँग्रेसमध्येच टक्कर आहे, तुम्ही आपलं मत वाया घालवू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस