Goa Election 2022: देवेंद्र फडणवीस चुकीचे बोलले, ते मला भेटले होते पण...; प्रतापसिंह राणेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:13 AM2022-01-21T09:13:22+5:302022-01-21T09:14:55+5:30

Goa Election 2022: भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. 

goa election 2022 pratap singh rane reply devendra fadnavis spoke wrongly | Goa Election 2022: देवेंद्र फडणवीस चुकीचे बोलले, ते मला भेटले होते पण...; प्रतापसिंह राणेंचे प्रत्युत्तर

Goa Election 2022: देवेंद्र फडणवीस चुकीचे बोलले, ते मला भेटले होते पण...; प्रतापसिंह राणेंचे प्रत्युत्तर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पणजी :  भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविषयी चुकीची माहिती दिल्याचे काँग्रेस नेते, आमदार प्रतापसिंग राणे यांनी म्हटले आहे. ‘फडणवीस तेव्हा मला भेटले होते, ही खरी गोष्ट आहे. परंतु, या भेटीत राजकीय स्वरूपाची चर्चा झाली नाही.  पर्ये मतदारसंघ काढून दुसऱ्याला देण्यासाठी मतदारसंघ  माझी खासगी मालमत्ता नाही’ असे राणे म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार प्रतापसिंग राणे यांच्याविषयी भाजपचे केंद्रीय नेते अपप्रचार करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी केला आहे दिव्या राणे यांना उमेदवारी देताना भाजपने प्रतापसिंग राणे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी दिली.   प्रतापसिंग राणेंचा त्यासाठी आशीर्वाद आहे, असे भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले होते. कार्यकर्ते चलबिचल करण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे.
 

Web Title: goa election 2022 pratap singh rane reply devendra fadnavis spoke wrongly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.